गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
जयदीप मेढे June 28, 2026 08:13 PM

Michael Vaughan on Team India Coach: ज्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली संघाने टी-20 विश्वचषक जिंकला, त्याला अवघ्या काही महिन्यांतच संघातून काढून टाकले जाते, असं कधी होत नाही, पण असंच काहीसं भारतात घडलं. जिथे श्रेयस अय्यरने सूर्यकुमार यादवची जागा घेत टी-20 कर्णधारपद स्वीकारले. यावर प्रतिक्रिया देताना, इंग्लंडचे महान क्रिकेटपटू मायकल वॉन म्हणाले की, भारतात प्रतिभेची कमतरता नाही, पण जेव्हा त्यांना श्रेयसच्या नवीन टी-20 कर्णधारपदी नियुक्ती झाल्याचे कळले, तेव्हा त्यांना वाटले की रिकी पाँटिंग भारतीय संघाचा प्रशिक्षक होईल.

रिकी पाँटिंग टीम इंडियाचा प्रशिक्षक होईल

अजिंक्य रहाणेच्या यूट्यूब चॅनलवर मायकल वॉन म्हणाले, "जेव्हा मी हे ऐकले, तेव्हा मला वाटले की रिकी पाँटिंग टीम इंडियाचा प्रशिक्षक होईल, कारण त्यांची जोडी खूप छान जमते. तो एक खूप चांगला कर्णधार आणि एक महान खेळाडू आहे, आणि हे भारतीय क्रिकेटची, विशेषतः टी-20 क्रिकेटमधील ताकद आणि खोली दर्शवते. इतर कोणत्याही देशात असे क्वचितच घडते, जिथे नुकताच टी-20 विश्वचषक जिंकलेल्या कर्णधाराला संघातून काढून टाकले जाते."

अय्यर-पाँटिंग अप्रतिम समन्वय

श्रेयस अय्यर आणि रिकी पाँटिंग यांची जोडी विलक्षण ठरली आहे. 2020 मध्ये, अय्यर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता आणि रिकी पॉन्टिंग प्रशिक्षक होता. त्या हंगामात दिल्ली संघ आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. रिकी पाँटिंग आणि श्रेयस अय्यर 2025 च्या हंगामात पुन्हा एकत्र आले, पण यावेळी ते पंजाब किंग्स संघाचा भाग होते. पंजाब संघ 2025 च्या हंगामात अंतिम फेरीत पोहोचला आणि 2026 च्या हंगामातही पंजाब संघ प्लेऑफमध्ये पोहोचला.

कर्णधार अय्यरची खराब सुरुवात

भारतीय कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या प्रवासाची सुरुवात खराब झाली आहे. अय्यरच्या कर्णधारपदाखाली भारताला आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव पत्करावा लागला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाविरुद्ध आयर्लंडने मिळवलेला हा पहिलाच विजय होता.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.