100, 200 रुपयांच्या नोटांबाबत मोठी बातमी; लोकांनी रोख रक्कम घरात साठवण्यास का सुरुवात केलीये?
Tv9 Marathi June 28, 2026 08:45 PM

सध्या 100 आणि 200 रुपयांच्या नोटांसंदर्भात एक नवा ट्रेंड पहायला मिळत आहे. लोक पूर्वीपेक्षा आता मोठ्या प्रमाणात आपल्या घरामध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा साठवून ठेवताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची मागणी वाढली आहे. लोक आपल्या घरात 100 आणि 200 रुपयांच्या नोटा साठवून ठेवत आहेत, याचा अर्थ हा नाहीये की बाजारात या नोटांचा तुटवडा आहे, मात्र खबरदारी म्हणून लोक आता आपल्या घरांमध्ये रोख रक्कम अधिक ठेवताना दिसत आहेत.

लोक आपल्या घरात अधिक रोकड का ठेवत आहेत?

मिडिया रिपोर्टनुसार अमेरिका आणि इराण युद्धामुळे पश्चिम आशियामध्ये तणाव प्रचंड वाढला आहे, यामुळे जागतिक अस्थिरता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आता लोकांनी आपल्याजवळ अधिक रोकड बाळगण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. जेव्हा -जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, जागतिक अस्थिरता निर्माण होते, तेव्हा लोकांचा कल हा अधिकाधिक प्रमाणात रोकड जवळ ठेवण्याकडे वाढतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. लोकं आपल्या दैनंदिन गरजांसाठी ऑनलाईन ऐवजी कॅश पैशांचा वापर करतात, यामुळेच सध्या भारतामध्ये लोक 100 आणि 200 रुपयांच्या चलणी नोटा घरात साठवून ठेवत असल्याचं पहायला मिळत आहे.

कोरोनानंतर परिस्थिती बदलली

मिडिया रिपोर्टनुसार कोरोनानंतर ही परिस्थिती बदलल्याचं पहायला मिळत आहे, कोरोनानंतरच्या काळात कॅशने केलेल्या व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे, तर ऑनलाईन व्यवहारांचं प्रमाण तुलनेनं थोडं कमी झालं आहे. अपत्कालीन परिस्थितीमध्ये लोक अशा पद्धतीचा व्यवहार करू शकतात. याचा अर्थ हा नाही की लोकांचा ऑनलाईन पेमेंट सिस्टमवरील विश्वास कमी झाला आहे, ऑनलाईन व्यवहार देखील झपाट्याने वाढत आहेत, परंतु दुसरीकडे पैशांच्या कॅश स्वरुपातील व्यवहारांमध्ये देखील वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

राज्यात 100, २०० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का?

राज्यात 100, २०० रुपयांच्या नोटांचा तुटवाड आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर राज्यात किंवा देशात कोणत्याही नोटांचा तुटवडा नाहीये, सरकारने तसं ऑफिशियली जाहीर केलेलं नाहीये, भारतीय रिझर्व्ह बँकेत चलनाचा मोठा साठा उपलब्ध आहे. मात्र सध्याची परिस्थिती पहाता लोक काही प्रमाणात घरामध्ये 100, २०० च्या नोटांचा साठा करताना दिसत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.