कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयसीसी टी20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 30 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 170 धावा केल्या. हरमनप्रीतने शेवटच्या ओव्हरमध्ये 3 सिक्स ठोकून भारताला 170 धावांपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच स्मृती मंधाना, शफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्स या तिघींनी 30 पेक्षा अधिक धावा केल्या. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये 8.55 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत. आता ऑस्ट्रेलिया विजयी आव्हान पूर्ण करणार की भारतीय गोलंदाज उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून देणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.