Pulse Polio Drive : उरुळी कांचनसह सात गावांत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम; ४४३७ पैकी ४१४० बालकांना दोन थेंब
esakal June 29, 2026 12:45 AM

सुनील जगताप

उरुळी कांचन : आज प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचन अंतर्गत सर्व गावांमध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेसाठी उरुळी कांचन,या मोहिमेचे उदघाटन उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे प्रशासक मिलिंद जगताप यांच्या शुभहस्ते पार पडले,याप्रसंगी माजी सरपंच भाऊसाहेब कांचन,माजी उपसरपंच संचिता कांचन,यशवंतचे संचालक संतोष कांचन,वैद्यकीय अधिकारी डॉ.सूर्यकांत हनमंते व डॉ.सागर नाशिककर आदी मान्यवर उपस्थित होते.

उरुळी कांचन,भवरापूर,कोरेगाव मूळ,शिंदवणे,वळती,टिळेकरवाडी व खामगाव टेक या सात गावांमध्ये ठिकठिकाणी एकूण ३६ बूथचे नियोजन करण्यात आले होते.तसेच दोन ट्रांझीट टीम्स व एक मोबाईल टीम देखील होती.या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण ४४३७ बालकांपैकी ४१४० बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात आले.

उर्वरित सर्व बालकांना दिनांक ३० जून ते २ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत घरोघरी जाऊन डोस पाजण्यात येतील. ही मोहीम राबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे तीन सुपरवायझर्स,सर्व आरोग्य सेवक व सेविका,दोन गटप्रवर्तक व सर्व ३५ आशा स्वयंसेविका तसेच अंगणवाडी सेविकांचा सहभाग होता.प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रथम वैद्यकीय अधिकारी डॉ.मेहबूब लुकडे,द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉ.सूर्यकांत हनमंते व डॉ.सागर नाशिककर यांनी या मोहिमेचे संनियंत्रण केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.