अतिरिक्त कमाईसाठी जबरदस्त आठवडा; Tata, Mahindra, Bajaj सह 46 कंपन्या देणार लाभांश; रेकाॅर्ड तारखांवर लक्ष ठेवा
ET Marathi June 29, 2026 02:45 AM
मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी पुढील आठवडा अतिरिक्त कमाईसाठी जबरदस्त ठरणार आहे. या आठवड्यात ४६ कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देणार आहेत. या यादीत टाटा, महिंद्रा, बजाज, बायोकॉन आणि रेमंड यांसारख्या बड्या कॉर्पोरेट समूहांचा तसेच उत्तम कामगिरी करणाऱ्या अनेक मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांचा समावेश आहे.
या यादीतील काही कंपन्या अंतिम लाभांशासोबतच विशेष लाभांशही देणार आहेत. या कंपन्यांचे शेअर्स आगामी आठवड्यात एक्स-डिव्हिडंड व्यवहार करतील. त्यामुळे गुंतवणूकदारांना रेकाॅर्ड तारखांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. रेकाॅर्ड तारखेला ज्या गुंतवणूकदारांकडे शेअर्स असतील त्यांना लाभांश मिळेल.
२९ जून रोजी एक्स-डिव्हिडंड होणारे शेअर्स
ज्योती लॅब्स लिमिटेड -प्रति शेअर ३. ५० रुपये
कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड - प्रति शेअर २. ५० रुपये अंतिम लाभांश
कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड - प्रति शेअर ११ रुपये अंतिम लाभांश
रेमंड लाइफस्टाइल लिमिटेड - प्रति शेअर १ रुपये अंतिम लाभांश
३० जून २०२६
बजाज फिनसर्व्ह लिमिटेड - प्रति शेअर १. ५० रुपये अंतिम लाभांश
बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड - गुंतवणूकदारांना दुहेरी लाभ. प्रति शेअर ८० रुपये अंतिम लाभांश आणि प्रति शेअर ५० रुपये विशेष लाभांश.
बजाज फायनान्स लिमिटेड - प्रति शेअर ६ रुपये अंतिम लाभांश
महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड -प्रति शेअर ६० रुपये इतका भरीव अंतिम लाभांश
वेल्सपन कॉर्प लिमिटेड - प्रति शेअर ५ रुपये अंतिम लाभांश
१ जुलै २०२६
डीसीएम श्रीराम फाईन केमिकल्स लिमिटेड - प्रति शेअर ₹०. ४० (४० पैसे) इतका अंतिम लाभांश
ग्रोव्ही इंडिया लिमिटेड - प्रति शेअर ₹०. १० (१० पैसे) इतका अंतिम लाभांश
२ जुलै २०२६
केमबॉन्ड मटेरियल टेक्नॉलॉजीज लिमिटेड - प्रति शेअर २ रुपये अंतिम लाभांश
लॉइड्स एंटरप्रायझेस लिमिटेड - प्रति शेअर ०. ०५ रुपये (५ पैसे) अंतिम लाभांश
अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड- प्रति शेअर १ रुपये अंतिम लाभांश आणि त्याच दिवशी एका विशेष लाभांशाची (ज्याची नेमकी रक्कम सध्या निश्चित केली जात आहे) अंमलबजावणीही होईल.
३ जुलै २०२६ : ३२ कंपन्या एकाच दिवशी देणार
अॅल्युफ्लोराइड लिमिटेड - प्रति शेअर ४ रुपयांचा अंतिम लाभांश
बालाजी अमाइन्स लिमिटेड - प्रति शेअर ११ रुपयांचा अंतिम लाभांश
बीएफ इन्व्हेस्टमेंट लिमिटेड - प्रति शेअर १० रुपये अंतिम लाभांश
भारत फोर्ज लि - प्रति शेअर ६. ५० रुपयांचा अंतिम लाभांश
बायोकॉन लि. - प्रति शेअर ०. ५० रुपये (५० पैसे) चा अंतिम लाभांश
कॅन फिन होम्स लि. - प्रति शेअर ८ रुपयांचा अंतिम लाभांश
दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लि. - प्रति शेअर १. ५० रुपयांचा अंतिम लाभांश
डीसीएम श्रीराम इंडस्ट्रीज - प्रति शेअर ०. ४० रुपये (४० पैसे) लाभांश
एस्कॉर्ट्स कुबोटा - प्रति शेअर ३३ रुपयांचा मोठा अंतिम लाभांश
एक्साईड इंडस्ट्रीज - बॅटरी उत्पादन करणारी ही मोठी कंपनी प्रति शेअर २ रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर करेल
ग्लोस्टर लि. - प्रति शेअर २० रुपयांचा अंतिम लाभांश
ग्रीनलॅम इंडस्ट्रीज लि. - प्रति शेअर ०. ४० रुपये (४० पैसे) अंतिम लाभांश
इंडस फायनान्स लि. - प्रति शेअर ०. ६० रुपये (६० पैसे) अंतिम लाभांश
जेएसडब्ल्यू ड्युलक्स लिमिटेड - प्रति शेअर 50 रुपयांचा मोठा अंतिम लाभांश
किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड - प्रति शेअर 8.50 रुपये अंतिम लाभांश
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड - प्रति शेअर 33 रुपये अंतिम लाभांश जाहीर करेल
महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड - प्रति शेअर 3.50 रुपयांचा अंतिम लाभांश
मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेड - प्रति शेअर 2.00 रुपये अंतिम लाभांश
ऑनवर्ड टेक्नॉलॉजीज लिमिटेड - प्रति शेअर 2 रुपये अंतिम लाभांश
रेमंड रियल्टी लि - प्रति शेअर 2 रुपये अंतिम लाभांश
रेडिंग्टन लि. - प्रति शेअर 6 रुपयांचा अंतिम लाभांश
सागरसॉफ्ट (इंडिया) लि. - प्रति शेअर 1.50 रुपयांचा सामान्य लाभांश
श्रीराम फायनान्स लि. - प्रति शेअर 6 रुपयां अंतिम लाभांश
एसकेएफ इंडिया लि. - प्रति शेअर 40 रुपयांचा अंतिम लाभांश
एसकेएफ इंडिया (इंडस्ट्रियल) लि. - प्रति शेअर १० रुपयांचा अंतिम लाभांश
एसएमएल महिंद्रा लि. - प्रति शेअर २३. ५० रुपयांचा अंतिम लाभांश
स्वराज इंजिन्स लि. - प्रति शेअर ११० रुपयांचा अंतिम लाभांश
टेक महिंद्रा लि. - प्रति शेअर ३६ रुपयांचा अंतिम लाभांश देईल
थर्मॅक्स लि. - प्रति शेअर 14 रुपयांचा अंतिम लाभांश देईल. याव्यतिरिक्त प्रति शेअर 6 रुपये विशेष लाभांश
ट्रान्सकॉर्प इंटरनॅशनल लिमिटेड - प्रति शेअर 0.40 रुपये (40 पैसे) अंतिम लाभांश
युनियन बँक ऑफ इंडिया - प्रति शेअर 5 रुपयांचा लाभांश
वेल्सपन एंटरप्रायझेस लिमिटेड - प्रति शेअर 3 रुपयांचा अंतिम लाभांश