Mumbai Moharram Poison Pill Case : मुंबईतील भायखळा परिसरात मोहरमच्या मिरवणूकीत घातपात करण्याचा मोठा कट रचणाऱ्या फैयाज प्रेमजीचं पितळ उघडं झालं आहे. अटकेत असलेल्या फैयाज प्रेमजी याने चौकशी दरम्यान मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मानसिकरित्या प्रचंड खचलेला होता. एवढंच नाही तर, फैयाज प्रेमजी संपूर्ण जगाला स्वतःचा शत्रू मानत होता… पोलिस अद्याप याप्रकरणी पुढील चौकशी करत आहे. सुरुवातीच्या चौकशीदरम्यान, आरोपीने पोलिसांना कथितरीत्या सांगितले की, त्याला जगाचा बदला घ्यायचा होता. सर्वांनी मिळून आपल्यावर अन्याय केला आहे, असं त्याला वाटत आहे. आरोपीला काही मानसिक आजार होता का आणि तो एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचार घेत होता का, याचाही तपास आता पोलीस करत आहेत.
फैयाज प्रेमजी याला बायकोने सोडलंय
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फैयाज प्रेमजी याला बायकोने सोडलं आहे. बायकोने सोडल्यानंतर तो सतत तणावाखाली असायचा आणि निराश राहायचा. पोलिसांनी आरोपी फैयाज प्रेमजी याच्या वडिलांचा जबाब घेतला आहे. तर फैयाज प्रेमजी याची आई आणि बहीण सध्या इराण याठिकाणी राहत आहेत.
AI कडून घेतली माहिती…
तपासादरम्यान, पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवला आहे. प्राथमिक चौकशीतून असं समोर आलं आहे की, मानवी शरीरावर झिंक फॉस्फाइडच्या विविध प्रमाणांचा काय परिणाम होतो, याची माहिती मिळवण्यासाठी आरोपीने आपल्या फोनवरील एका ‘एआय’ (AI) टूलचा वापर केला होता. तसेच, झिंक फॉस्फाइडचा स्रोत काय होता आणि ते त्याने कसं मिळवलं, याचाही तपास पोलीस करत आहेत.
बीबीए पास आहे आरोपी
तपासादरम्यान, पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवला आहे. प्राथमिक चौकशीतून असे समोर आलं आहे की, मानवी शरीरावर झिंक फॉस्फाइडच्या विविध प्रमाणांचा काय परिणाम होतो, याची माहिती मिळवण्यासाठी आरोपीने आपल्या फोनवरील एका ‘एआय’ (AI) टूलचा वापर केला होता. तसेच, झिंक फॉस्फाइडचा स्रोत काय होता आणि ते त्याने कसे मिळवले, याचाही तपास पोलीस करत आहेत….
पुणे पोलिसांच्या एका पथकाने त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा घरात मोठ्या संख्येने उंदीर आढळून आले. आरोपीला ‘झिंक फॉस्फाइड’सारख्या उंदीर मारण्याच्या रसायनांची माहिती असण्यामागे हेच कारण असावं, असा पोलिसांचा अंदाज आहे. सध्या पोलीस आरोपीच्या डिजिटल हालचाली, मेडिकल रिकॉर्डआणि संबंधित रसायनाची खरेदी या सर्व बाबींचा तपास करत आहेत. या प्रकरणातील फॉरेन्सिक अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.