1. Aashiqui 2 (2013) – श्रद्धा कपूर हीने आशिकी – २ मधून दणक्यात पदार्पण केले होते. या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्याबरोबर श्रद्धा कपूर हीचाही संयत अभिनय गाजला होता. आरोही नावाचे कॅरेक्टर श्रद्धाने साकारले होते. हा चित्रपट म्युझिकट हीट ठरला होता.
3. Haider (2014) – ‘हैदर’ हा चित्रपट विशाल भारद्वाज यांनी दिग्दर्शित केला असून यात शेक्सपिअरच्या हॅम्लेटवरुन तो प्रेरित आहे. यात श्रद्धा कपूर हीने अर्शिया नावाचे पात्र साकारले आहे.यात शाहीद कपूरने लीड रोल केला आहे. समीक्षकांनी हा चित्रपट गौरवला होता.
4. ABCD 2 (2015) – या संपूर्णपणे नृत्यावर आधारित चित्रपटात श्रद्धा कपूर हीचा नवा अवतार पाहायला मिळाला. तरुणांना हा चित्रपट आवडला.
5. Baaghi (2016) – हा देमारपट होता. यात श्रद्धाने सिया नावाचे कॅरेक्टर साकारले होते. टायगर श्रॉफ याच्या सोबत तिची केमिस्ट्री जुळली होती. या चित्रपट कमर्शियली हीट झाला.
6. Half Girlfriend (2017) – चेतन भगत यांच्या कांदबरीवर आधारित या चित्रपटात श्रद्धा कपूरने रिया सोमानी कॅरेक्टर साकारले होते. चित्रपटाने तिकीट बारीवर बऱ्यापैकी कमाई केली.
7. Stree (2018) – हॉरर कॉमेडी गटातील या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. राजकुमार राव सोबत या चित्रपटात श्रद्धा कपूर रहस्यमयी कॅरेक्टर साकारले होते.
8. Chhichhore (2019) – हा चित्रपट कॉमेडी ड्रामा होता. माया नावाचे कॅरेक्टर यात श्रद्धाने साकारले होते. चित्रपट समीक्षकांनी आणि व्यावसायिक दोन्ही आघाडीवर हा चित्रपट यशस्वी म्हटला जातो.