Ram Mandir Credit Row: राम मंदिराचे श्रेय मोदींचे, चोरीची जबाबदारी दुसऱ्यावर; काँग्रेस प्रवक्ते पवार यांचा भाजपवर घणाघात
esakal June 30, 2026 03:45 AM

मंगळवेढा : रामाच्या नावावर पंतप्रधानानी मतं मागितली, मंदिर उभारताना व मूर्ती स्थापना करताना पंतप्रधान मोदी, राम मंदिराच्या बाबतीत सर्व गोष्टी करताना पंतप्रधानाने श्रेय द्यायचे आणि मंदिरातील चोरीची जबाबदारी मात्र इतरावर ढकलण्याचा प्रकार भाजपाने केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केला.

मतदार यादी विशेष सखोल पूर्ण निरीक्षण 2026 बाबत प्रमुख पदाधिका व कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर हॉटेल सुगरण येथे घेण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी खा. प्रणिती शिंदे ,एस आय आर जिल्हाप्रमुख डॉ.स्मिता शहापूरकर,रोहिणी धोत्रे जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे राज्य सचिव अॅड रविकिरण कोळेकर शहराध्यक्ष राहुल घुले , अँड दत्तात्रय खडतरे, रवींद्र शिवशरण, ज्ञानेश्वर सोरडीकर, राजन ठेंगील, सत्तार इनामदार , आयेशा शेख बजरंग चौगुले ,पंढरपूर तालुकाध्यक्ष संदीप पाटील बी एल ए -1 संदीप पवार तसेच मंगळवेढा शहर व तालुक्याचे सर्व BLA2 उपस्थित होते.

सर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना प्रवक्ते पवार म्हणाले की,पुढच्या लोकसभेची निवडणूक होईल की नाही,या देशात लोकशाही राहील की नाही हे सांगता येत नाही याचा निर्णय मात्र एस आय आर मोहिमेतून ठरणार आहे. भाजपाला ज्यावेळी मताची गरज होती त्यावेळी सर्व महिलांना लडकी बहीण योजनेचे अर्ज भरावयास लावले. जनतेने भरलेल्या कराचे पैसे खिरापती सारखे वाटले आणि जाहिरात मात्र स्वतःहून दिल्यासारखे करून बहिणीचा लाडका भाऊ म्हणून केली आणि आता एक कोटी बहिणीला बोगस ठरवले निवडणूक लागले की लाडकी बहीण आणि निवडणूक झाली की बोगस बहीण असे दुठप्पी धोरण भाजपाचे आहे महिलावर अत्याचार करणाऱ्या बलात्काऱ्यांना शिक्षा माफ करून त्यांना मान सन्मान देण्याचे काम केले काँग्रेसने कधी जाती धर्मात व तेढ लावून पोळी भाजण्याचे काम केले नाही सध्या कधी हिंदू मुस्लिम कधी मराठा ओबीसी असा वाद लावला.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या बुथमधील एक ही नाव कमी होणार नाही यासाठी लक्ष द्यावे भूत सोडून इतर प्रश्न बाजूला ठेवावेत सध्या नीट पेपर फोडला,टीईटीचा पेपर फोडला, पक्ष फोडले,खासदार व आमदार फोडले आणि आता तर मंदिराची दानपेटी देखील फोडली असल्याने सध्या लोकशाहीत टिकवण्यासाठी ही शेवटची संधी एसआयआर च्या माध्यमातून आहे या संधीत कार्यकर्त्यांनी लक्ष देऊन काम करण्याचे आवाहन पवार यांनी केले.शहराध्यक्ष प्रास्ताविक अॅड राहुल घुले यांनी केले.यावेळी खा प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार,यांची भाषणे झाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.