Shraddha Kapoors Eetha Mohit Narayangaonkar: 'ईठा' (Eetha) सिनेमाचा टीझर (Movie Teaser) रिलीज झाला अन् अभिनेत्री श्रद्धा कपूरवर (Shraddha Kapoor) कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. प्रसुती वेदना, बाळाला जन्म दिल्यानंतर पुन्हा त्याच जोमात रंगमंचावर लोककला आणि प्रेक्षकांसाठी उभ्या राहणं, खरंच सोपं नाही. तमाशा सम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांनी आपल्या कारकिर्दीत लोककलेची सेवा केली. त्यांच्या आयु्ष्यावर आधारीत 'ईठा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मध्यंतरी 'ईठा' या सिनेमाच्या नावावरुन प्रचंड वाद निर्माण झाला होता. वाद इतका पेटला की, विठाबाईंच्या घरातील सदस्यांनीही या सिनेमाच्या नावाचा विरोध केला होता. पण हा वाद आता निवळला आहे, अशी माहिती आहे. आता या चित्रपटाची टीम प्रदर्शनापूर्वी नारायणगावला भेट देण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी विठाबाई नारायणगावकर यांच्या फॅमिलीशी चर्चा केली. तसेच सिनेमाचे नाव 'ईठा' असे का ठेवण्यात आले, याबद्दलही सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, या स्पष्टीकरणामुळे कुटुंबाचे समाधान झाले असून, त्यांनी या सिनेमाच्या नावावर असलेला आक्षेप मागे घेतला आहे. एनडीटीव्हीशी बोलताना विठाबाईंचे नातू मोहित नारायणगावकर म्हणाले, 'हो आम्ही आता या गोष्टीशी समाधानी आहोत. त्यांनी आमच्याशी फोनवरुन संवाद साधला'.
'सुरुवातीला आम्ही या सिनेमाचे शीर्षक बदलण्याची विनंती केली होती. पण त्यानंतर त्यांनी यामागचे कारण समजावून सांगितले. ग्रामीण भागात विठाबाईंना पूर्वी 'ईठा' या नावाने ओळखले जात होते. त्यामुळे त्यांनी या सिनेमासाठी हे शीर्षक निवडले. आता आम्हाला याची काहीच अडचण नाही', असं मोहित यांनी स्पष्ट केलं. 'हा सिनेमा अगदी सकारात्मक पद्धतीने बनवण्यात आला आहे. हा सिनेमाने तमाशा आणि लावणी समाजाला उत्तमरित्या सादर केले आहे. आता आम्हाला कोणतीच अडचण नाही', असं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी संवाद साधत असताना मोहितने हे देखील उघड केले की, 28 ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी श्रद्धा कपूर अन् सिनेमाची टीम नारायणगावला भेट देण्याची शक्यता आहे, असं त्यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात श्रद्धा कपूर देखील सहभागी होणार असल्याची माहिती आहे. यावेळी मोहित नारायगावकर यांनी सिनेमाचा प्रिमिअर नारायणगावमध्ये करण्याची विनंती केली. मोहितने यावर सांगितले की, लक्ष्मण उतेकर यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संपूर्ण टीम त्या गावाला भेट देईल, असे आश्वासन दिले.
महत्त्वाच्या इतर बातम्या: