धरणातून पूर्वसूचना न देता पाणी सोडले, ट्रॅक्टरसह तिघे वाहून गेले,काळा आला होता, पण…
Tv9 Marathi July 04, 2026 08:45 PM

गोंदिया, दि.४ ( नितीन कुथे ) – भंडारा येथील प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. प्रशासनाचा जीवघेणा हलगर्जीपणा या घटनेतून उघडकीस आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेजमधून कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वैनगंगा नदीत लाखो क्युसेक पाणी सोडण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेजमधून कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वैनगंगा नदीत लाखो क्युसेक पाणी सोडण्यात आले.या पाण्याचा मोठा लोंढा आल्याने तुमसर तालुक्यातील माडगी नदीपात्रात रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम करणारे ३ कामगार ट्रॅक्टरसह नदीच्या पुरात अडकले आणि बघता बघता वाहून गेले. मात्र काळ आला होता पण वेळ आली नव्हती…

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील माडगी परिसरात वैनगंगा नदीपात्रात ही थरारक घटना घडली. इथे रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र, अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे ट्रॅक्टर चालकासह दोन कामगार ट्रॅक्टरसह नदीच्या पात्रात अडकले. नियमानुसार कोणत्याही धरण किंवा बॅरेजमधून पाणी सोडण्यापूर्वी स्थानिक प्रशासन आणि नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी करणे बंधनकारक असते. मात्र, धापेवाडा बॅरेजच्या प्रशासनाने या नियमाला हरताळ फासला.  धापेवाडा बॅरेज प्रशासनाचा हा हलगर्जीपणा तीन निष्पाप कामगारांच्या जीवावर बेतला असता. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

तरीही प्रशासकीय समन्वयाच्या अभावाचा हा एक मोठा आणि गंभीर नमुना आहे. या प्रकरणी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत धापेवाडा बॅरेजच्या अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आता या नोटिसीला धापेवाडाचे अभियंता काय उत्तर देतात आणि जिल्हाधिकारी त्यांच्यावर काय कडक कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान

गेल्या दोन दिवसांमध्ये भंडारा जिल्ह्यासह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मध्यप्रदेशच्या सीमेवरील धापेवाडा बॅरेजमधून पूर्व सूचना न देता पाणी सोडण्यात आल्याने गोंधळ उडाला. हे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आले. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून वाहणाऱ्या माडगी परिसरातील नदीपात्रातून हे पाणी वाहत गेले. मात्र, याची कुठलीही कल्पना नसताना या नदीपात्रातून जाणाऱ्या एका ट्रॅक्टरवर बसलेले तिघेही जण नदी पाण्याच्या पात्रात अडकले. बघता बघता ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला आणि यावेळी तिघांनीही स्वतःची कशीबशी सुटका करीत नदीचे पैलतीर गाठले. मात्र, यात ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

येथे व्हिडीओ पाहा –

धरणातून पूर्वसूचना न देता पाणी सोडले, ट्रॅक्टरसह तिघे वाहून गेले,काळा आला होता,पण…https://t.co/1sEUrnMwib#Tractorwashedaway #dhapewadabarrage #Gondia #DhapewadaBarrage #Bhandara pic.twitter.com/sGiWwAwOq0

— Atul B. Kamble (@atulkamble123) July 4, 2026

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.