जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील सबगव्हाण टोलनाक्याजवळ शनिवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या केमिकल टँकरने टोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर केमिकल टँकरने क्षणात पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत टँकरचा चालक आणि क्लिनर यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. धुळेकडून पारोळ्याकडे येणाऱ्या केमिकल टँकरचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर टोल नाक्यावर उभ्या असलेल्या दुसऱ्या टँकरला त्याने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, केमिकल टँकरच्या पुढील भागाने तात्काळ पेट घेतला आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले.
The Burning Truck : जळगावात महामार्गावर 'द बर्निंग ट्रक'चा थरार; टायर फुटल्याने आग; चालक-क्लीनरने वेळीच उड्या घेतल्याने बचावलेघटनेची माहिती मिळताच पारोळा पोलीस, महसूल प्रशासन, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी पारोळा नगरपालिकेच्या अग्निशमन दलासोबत धुळेहूनही अग्निशमन बंब मागवण्यात आला. केमिकलमुळे आग अधिक भडकू नये म्हणून फोमचा वापर करण्यात आला. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आलं.
Kolhapur Ratnagiri Highway: कोल्हापूर रत्नागिरी हायवेवर बर्निंग ट्रकचा थरार, डिवायडरला धडकताच भडकली आग; २० लाखांच्या टायर खाकअपघातानंतर कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये म्हणून धुळे आणि पारोळा या दोन्ही दिशांवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या आगीत टोलनाक्याचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने आग वेळीच नियंत्रणात आल्याने केमिकलमधून विषारी वायू पसरून मोठा अनर्थ टळला. या अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरु केल आहे.