पुणे : कौटुंबिक न्यायालयातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत एकता पॅनेलने निर्विवाद वर्चस्व राखत सर्व ११ जागांवर विजय मिळवला. अध्यक्षपदासाठी झालेल्या दुहेरी लढतीत ॲड. सुनीता जंगम यांनी सर्वाधिक ३६२ मते घेऊन विजय संपादन केला. त्यापाठोपाठ, ॲड. स्मिता देशपांडे यांना ११४ मते मिळाली.
उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी झालेल्या लढतीत ॲड. कोमल देशमुख या ३८९ तर ॲड. राहुल पडवळ हे २९६ मते मिळवून विजयी झाले. सचिव पदी ॲड. राहुल जाधव यांची निवड झाली. त्यांना ३४६ मते मिळाली. सहसचिवपदी ॲड. मोहन बाराथे, खजिनदार पदी ॲड. संभाजी पांचाळ यांनी विजय संपादन केला. कार्यकारिणी सदस्यपदी ॲड. सुरेखा डाबी, ॲड. अमृता पवार, ॲड. कविता गोरे, ॲड. तेजोमय ननवरे आणि ॲड. संकेत सुपेकर हे विजयी झाले.
शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात शुक्रवारी (ता.३) मतदान प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासह अकरा जागांसाठी तब्बल २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. रात्री उशिरापर्यंत चालेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. प्रणय लंजिले तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. विलास राऊत आणि अॅड. भाग्यश्री गुजर-मुळे यांनी कामकाज पाहिले.