-कल्याण पाचांगणे
माळेगाव: अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना पुढील काही दिवसातच पूर्णत्वाला येणार आहे. या महत्वकांक्षी योजनेमध्ये लाखो शेतकऱ्यांना लाभ देण्याचे शासनाचे धोरण आहे, परंतु या प्रक्रियेत इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले. सीजनल साखर कामगारांनाही या योजनेत सहभागी करून घेण्याचा शासन स्तरावर विचार सुरू असल्याचेही कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त बारामती येथे कर्तृत्व, समाजसेवा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा संगम घडविणारा प्रेरणादायी सोहळा शनिवारी उत्साहात पार पडला. अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठान, बारामती या संस्थेच्या माध्यमातून वरील कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमात विशेषत; बारामती विधानसभा निवडणुकीत देशात प्रथम क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी धनगर समाजात शिक्षण, सेवा आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा प्रेरणादायी सोहळा पहाण्याचा आनंद मला झाला आहे, असे मत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
त्याचबरोबर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या यशस्वी उद्योजकांसह बारामतीतील विविध संस्थांवर प्रमुख पदांवर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनाही 'समाजभूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले. बारामती तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव केला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजसेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि लोकहिताची भावना जोपासण्याची गरज देवकाते यांनी बोलून दाखवली
Nagpur Pune Vande Bharat: प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणार नवीन १६/२० डब्यांचा रेक; विदर्भ–पश्चिम महाराष्ट्र प्रवास होणार सोयीचायावेळी बारामतीच्या विकासात विविध स्तरांवर मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, शंकर सहकार संकुलचे संस्थापक दत्तात्रेय येळे, बारामती नगरपालिकेचे नगराध्यक्ष सचिन सातव, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, उद्योजक रवींद्र काळे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.