Education Success Story: गंगापूरच्या सुनिल वायसळ यांची शैक्षणिक भरारी; वाणिज्य शाखेत पीएचडी पदवी, शेतकरी लेखापद्धतीवर संशोधन!
esakal July 05, 2026 10:45 PM

-जमील पठाण

गंगापूर : भेंडाळा (ता. गंगापूर) येथील श्री. सुनिल दत्तात्रय वायसळ यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडने वाणिज्य शाखेत पीएचडी पदवी जाहीर केली आहे. ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवछत्रपती महाविद्यालय, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे वाणिज्य विभागात कार्यरत आहेत.

वायसळ यांनी " स्टडी ऑफ फार्मर्स अकाउंटिंग अँड रेकॉर्ड कीपिंग प्रॅक्टिसेस इन औरंगाबाद डिस्ट्रिक्ट " या विषयावर डॉ. वैभव कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिशोब व नोंद ठेवण्याच्या दैनंदिन पद्धतींवर आधारित हा अभ्यास आहे.

या शैक्षणिक यशाबद्दल आ. सतीश चव्हाण, प्रदीप चव्हाण, सुधीर माने, प्राचार्य सी. एस. पाटील, उपप्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.