मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुमारे ८० टक्के पूर्ण झाले आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बोगदा खणण्याच्या कामाला विक्रोळी येथे आज सुरुवात झाली. विक्रोळी शाफ्ट येथे देशातील सर्वात मोठे टनेल बोरिंग मशिनद्वारा (टीबीएम) लाँच करण्यात आले. या मशिनद्वारे मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाच्या दिशेने बोगद्याचे उत्खनन सुरु करण्यात आले आहे. या टनेल मशिनचा व्यास चार मजल्याच्या बिल्डींग इतका आहे, या एकल बोगद्यातून अप आणि डाऊन अशा दोन बुलेट ट्रेनचे मार्ग बांधले जात आहेत. या २१ किमी भुयाराचा ५ किमी भाग आधीच एनएटीएम पद्धतीने पूर्ण झाले आहे. उर्वरित १६ किमी बोगदा आता या जायंट टीबीएम मशिनद्वारा खोदण्यात येणार आहे. या बोगद्याचा एक भाग ठाणे खाडीच्या खालून जाणार आहे.
Bullet Train Under sea tunnel work
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या रेल्वेच्या इतिहासातील सर्वात अजस्र अशा टनेल बोरिंग मशीनद्वारा (टीबीएम) आज विक्रोळी शाफ्ट येथून मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाच्या दिशेने बोगद्याच्या उत्खनन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे काम सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचा पहिला टप्पा सुरु होण्यास १५ ऑगस्ट २०२७ साल उजाडणार आहे. या पहिल्या टप्प्यात गुजरात राज्यातील सूरत ते बिलिमोरा पर्यंत ट्रेन चालवली जाईल.
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या एकूण २१ किमी लांबीच्या भूयारी बोगद्यापैकी मुंबईतील सावली ( घणसोली ) ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यानचा १६ किमी लांबीचा भाग टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने खोदण्यात येणार आहे. उर्वरित ५ किमी लांबीच्या भागाचे बांधकाम एनएटीएम पद्धतीने आधीच पूर्ण केले आहे.
विक्रोळी येथून सुरू होणारे टीबीएम बुलेट ट्रेनच्या अप आणि डाऊन ट्रॅकसाठी १६ किमी लांबीच्या एकल-नलिका बोगद्याचे उत्खनन करणार आहे. आपल्या प्रवासादरम्यान हे यंत्र मुंबईतील बीकेसी परिसरातील बहुमजली इमारती, रस्ते, मिठी नदी आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसह दाट नागरी वस्तीच्याखालून मार्गक्रमण करणार आहे.
५०० आशियाई हत्तींचे वजनहे टीबीएम भारतातील रेल्वे बोगदा बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या सर्वात मोठ्या यंत्रांपैकी एक आहे. यात १३.६ मीटर व्यासाचे विशाल कटरहेड ( चार मजली इमारतीच्या उंची इतके), ३,१०० टन वजन ( ५०० आशियाई हत्तींच्या वजनाइतके ) आणि ९६ मीटर एकूण लांबी (फुटबॉल मैदानाच्या (१०५ मीटर ) लांबीइतकी) आहे.