D-Mart हे एक असं शॉपिंग स्टोअर आहे, जिथे आपल्याला रोजच्या, दैनंदिन गरजेच्या वस्तू खूप कमी किमतीत मिळतात. याची सुरुवात राधाकृष्णन दमानी यांनी 2002 साली केली. ( All Photos : Social Media)
महिन्याच्या सुरुवातीला डी-मार्टमध्ये प्रचंड गर्दी का होते, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. विशेषतः 1 ते 7 तारखेदरम्यान खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांना लांबच लांब बिलिंगच्या रांगा, पार्किंगसाठी होणारी धावपळ आणि स्टोअरमधील मोठी गर्दी यांचा सामना करावा लागतो.
याशिवाय, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शनिवार किंवा रविवार आल्यास डी-मार्टमधील गर्दी आणखी वाढते. सुट्टीचा आणि वीकेंडचा फायदा घेत अनेक कुटुंबे एकत्र खरेदीसाठी येतात. परिणामी, स्टोअरमध्ये प्रत्येक विभागात मोठी वर्दळ दिसून येते.
गर्दीमुळे बिलिंगसाठी बराच वेळ वाट पहावी लागू शकते. अनेकदा खरेदी करण्यापेक्षा बिलिंगच्या रांगेत उभे राहण्यातच अधिक वेळ जातो. त्याचबरोबर वाहन पार्क करण्यासाठीही प्रतीक्षा करावी लागू शकते, कारण पार्किंगची जागा लवकर भरून जाते.
डी-मार्टमध्ये विविध आकर्षक ऑफर्स सुरू असल्यामुळे दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंचा साठा गर्दीमुळे आणि वाढलेल्या खरेदीमुळे लवकर संपण्याची शक्यता असते. तसेच, स्टोअरमध्ये खूप गर्दी असल्यास निवांतपणे वस्तू पाहणे, तुलना करणे आणि खरेदी करणेही अवघड होते.
जर तुम्हाला कमी गर्दीत आणि आरामात खरेदी करायची असेल, तर महिन्याच्या 10 ते 25 तारखेदरम्यान, विशेषतः सोमवार ते गुरुवार या दिवसांत डी-मार्टला भेट देणे अधिक सोयीचे ठरू शकते. तसेच, स्टोअर उघडल्यानंतर सकाळच्या वेळेत किंवा दुपारच्या सुमारास गेल्यास तुलनेने कमी गर्दीचा असल्याने निवांत खरेदी करता येऊ शकते.