अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील महामार्गावर अनेक फळविक्रेते, टपरीधारक छोटे मोठे व्यावसायिक यांनी आपल्या दुकानासमोर पत्र्याचे शेड उभा करून महामार्गालगत अतिक्रमण सुरू केले होते.यामुळे नेहमीच वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला,पादचारी,दिव्यांग याचबरोबर वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करत करावी लागत होती.
Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..याचबरोबर रस्त्याला लागून अनेकांनी लावलेले मोठमोठाले बॅनर, होर्डिंग्ज काढून घेण्यासाठी पालिकेने यापूर्वीच लेखी नोटीस बजावली होती. दिलेल्या वेळेत आपण महामार्गालगत केलेले अतिक्रमण काढून घेतले नाही. तर त्यावर हातोडा चालवून साहित्य वाहनातून जप्त करून नगर पालिकेत जप्त करण्यात येईल असा कडक इशारा देण्यात आला होता.
अखेर नगरपालिकेने रविवारी (ता.5) नगरसेवक केदार कुलकर्णी यांनी पुढाकार घेत जेसीबी, ट्रॅक्टर, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व चोख पोलिस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण हटविण्यात आले.यामुळे महामार्गावरील पाचोडनाका, बसस्थानक, आंबेडकर पुतळा, महावीर चौक, मोंढा, पंचायत समिती, मत्स्योदरी देवी मंदिर परिसर तसेच उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे.
Nagpur Pune Vande Bharat: प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणार नवीन १६/२० डब्यांचा रेक; विदर्भ–पश्चिम महाराष्ट्र प्रवास होणार सोयीचा महामार्गालगत अतिक्रमण नकोशहरातील महामार्गालगत अनेक छोटे- मोठे विक्रेते,टपरी धारक यांच्याकडून होणारे अतिक्रमण वाहतुकीला अडथळा ठरत आहे. याचबरोबर नागरिकांची, वाहन चालकांची नेहमीच कोंडी होत होती. याचबरोबर शहराला विद्रुपीकरण करणारे बॅनर, होल्डिंग्स काढून घेण्यासाठी पालिकेच्या वतीने लेखी नोटिसा देण्यात आल्या होत्या. अतिक्रमण काढण्यास सतत टाळाटाळ होत असल्याने अखेर हे अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.