-रोशन खैरनार
सटाणा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर अधिक सक्रिय भूमिका घेत बागलाण तालुक्यात दर मंगळवारी आढावा बैठकीच्या माध्यमातून 'मंगळवार पॅटर्न' राबविण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी केली.
Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..येथील राधाई मंगल कार्यालयात बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे झालेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हाध्यक्ष खैरे बोलत होते. बागलाण तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब कर्डक, आकाश पगार, ज. ल. पाटील, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, खेमराज कोर, फईम शेख आदि व्यासपीठावर होते. श्री.खैरे म्हणाले, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्यांच्या प्रश्नांबाबत तातडीने निर्णय व्हावेत यासाठी पक्ष प्रभावीपणे कार्य करेल.
अजितदादा पवार आणि जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांच्या अकाली निधनानंतर पक्षात निर्माण झालेली मरगळ दूर करण्याबरोबरच संघटनात्मक बांधणीच्या जोरावर आगामी महिनाभरात पक्ष नव्या जोमाने कार्यरत होईल. बागलाण तालुक्यात पक्ष संघटना सक्षम करण्यासाठी सातत्याने निष्ठेने कार्य करणारे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका ॲड. हुमेरा शेख यांचा विशेष सत्कार झाला. आर. टी. सोनवणे यांनी प्रास्ताविक केले, तर शशिकांत कापडणीस यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यास वसंतराव भामरे, किशोर ह्याळीज, महिला तालुकाध्यक्ष गायत्री कापडणीस, भारत खैरनार, तुषार वाघ, डॉ. योगेश गोसावी, चेतन कासव, योगिता पाटील, पूजा आहेर, यशवंत शिरसाट, राहुल कदम, संदीप वाघ, रत्नाकर सोनवणे, प्रसाद दळवी, संदीप भामरे, हेमंत मगर, अशोक भामरे, वैभव गांगुर्डे, यासिर शेख, रवी शिंदे, कैलास देवरे, डी. डी. खैरनार, सुजित सोनवणे, नानाजी ह्यालिज, दादाजी खैरनार, राहुल निकम, गौरव वाघ, मनोज खैरनार, शशी बागुल, आबा खैरनार, दिलीप खैरनार, रेवती सोनवणे, संजय बच्छाव, अशोक खैरनार, संदीप साळवे, गणेश पवार, साई सोनवणे, नितीन सोनवणे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. मेळाव्यात तहसीलदार कैलास चावडे यांनी आगामी मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले.
Nagpur Pune Vande Bharat: प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणार नवीन १६/२० डब्यांचा रेक; विदर्भ–पश्चिम महाराष्ट्र प्रवास होणार सोयीचा मेळाव्यानंतर प्रमुख नेत्यांच्या सदिच्छा भेटीमेळाव्यानंतर जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, नगराध्यक्षा हर्षदा पाटील, गटनेते राहुल पाटील, माजी तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी तसेच पक्षाच्या विविध पदाधिकारी व मान्यवरांची सदिच्छा भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.