पुणे: नवले पुलाजवळ ट्रक चालकाला अडवून लाकडी बांबूने बेदम मारहाण करत ट्रक जबरदस्तीने पळवून नेल्याची घटना शनिवारी (ता. ४) मध्यरात्री घडली. मात्र, घटनेनंतर चालकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी केलेल्या थरारक पाठलागामुळे काही अंतरावरच आरोपींना ट्रकसह ताब्यात घेतले.
Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..याप्रकरणी आनंद गजानन जामकर (वय २५, रा. सुरेखा पॅलेस, बाणेर), व्यंकटेश माधव देवणे (वय २२, रा. निर्वाणा पॅलेस, बावधन) आणि स्वराज वैजनाथ टाक (वय २४, रा. सिंहगड कॅम्पस, आंबेगाव बुद्रूक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच, एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पुरंदर तालुक्यातील नाझरे कडेपठार येथील ट्रक चालकाने (वय ४५) भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ट्रक घेऊन नवले पुलावरून कात्रजच्या दिशेने जात होते. आंबेगाव बुद्रूक येथील राजयोग टोयोटा शोरूमसमोर आले असता, पाठीमागून हॉर्न वाजवत आलेल्या आरोपींनी ट्रकसमोर गाडी आडवी करून तो थांबवला. त्यानंतर आरोपींनी लाकडी बांबूने ट्रकची काच फोडून चालकाला केबिनमधून खाली ओढत मारहाण केली. त्यानंतर खिशातील दीड हजारांची रोकड काढून घेत ट्रक पळवला.
Nagpur Pune Vande Bharat: प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणार नवीन १६/२० डब्यांचा रेक; विदर्भ–पश्चिम महाराष्ट्र प्रवास होणार सोयीचाट्रक चालकाने तातडीने ‘डायल ११२’ वर कॉल करून माहिती दिली. नियंत्रण कक्षाकडून संदेश मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बाह्यवळण मार्गावर नाकेबंदी करत अवघ्या काही अंतरावर ट्रकसह आरोपींना ताब्यात घेतले.