ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने रविवारी (५ जुलै) सातव्यांदा महिला टी२० वर्ल्ड कपचे विजेतेपद जिंकले आहे. लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात सोफी मोलिनेक्सच्या नेतृ्त्वातील ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया महिला संघाने पुन्हा एकदा टी२० मधील जगज्जेतेपद जिंकले.
Women's T20 World Cup वर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व! इंग्लंडला फायनलमध्ये पराभूत करत तब्बल सातव्यांचा 'चॅम्पियन'दरम्यान, ७ वेळा टी२० वर्ल्ड कप जिंकणारा ऑस्ट्रेलिया महिला संघ एकमेव संघ आहे. विशेष म्हणजे २००९ पासून सुरू झालेल्या महिला टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत आत्तापर्यंत चारच संघांनी विजेतेपद जिंकले आहे. त्यात ऑस्ट्रेलियानेच ७ वेळा विजेतेपद जिंकले. तसेच इतर तीन संघ इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड, यांनी प्रत्येकी एकदा महिला टी२० वर्ल्ड कपचे विजेतेपद जिंकले आहे.
तसेच सोफी मोलिनेक्स महिला टी२० वर्ल्ड कप जिंकणारी ७ वी कर्णधार ठरली आहे. याआधी सर्वाधिकवेळा कर्णधार म्हणून महिला टी२० वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगच्या नावावर आहे. तिने तब्बल ४ वेळा टी२० वर्ल्ड कप जिंकला आहे. याशिवाय शारलोट एडवर्ड्स, ऍलेक्स ब्लॅकवेल, जोडी फिल्ड्स, स्टेफानी टेलर आणि सोफी डिवाईन यांनी प्रत्येकी १ वेळा टी२० वर्ल्ड कप कर्णधार म्हणून जिंकला आहे.
ऑस्ट्रेलियाचे सातव्यांदा विजेतेपदरविवारी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडला २० षटकात ४ बाद १५० धावा करता आल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर १५१ धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने बेथ मुनीच्या ६४ धावांच्या जोरावर १७.१ षटकात ३ विकेट्स गमावत १५३ धावा करत पूर्ण केला.
विशेष म्हणजे यंदाच्या संपूर्ण स्पर्धेत ऑस्ट्रेलिया अपराजित राहिले. अंतिम सामन्याच्या आधीपर्यंत इंग्लंड देखील अपराजित होते. पण अंतिम सामन्यात त्यांना दुर्दैवाने या स्पर्धेतील पहिला पराभव स्वीकारावा लागला.
T20 World Cup 2026 Final: एलिस पेरीची विश्वविक्रमाशी बरोबरी, तर ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांचे अफलातून कॅच; पण तरी इंग्लंड दीडशे पार महिला टी२० वर्ल्ड कपमधील विजेते आणि उपविजेते संघ व विजेते कर्णधार २००९विजेते - इंग्लंड (कर्णधार - शारलोट एडवर्ड्स)
उपविजेते - न्यूझीलंड
विजेते - ऑस्ट्रेलिया (कर्णधार - ऍलेक्स ब्लॅकवेल)
उपविजेते - न्यूझीलंड
विजेते - ऑस्ट्रेलिया (कर्णधार - जोडी फिल्ड्स)
उपविजेते - इंग्लंड
विजेते - ऑस्ट्रेलिया (कर्णधार - मेग लॅनिंग)
उपविजेते - इंग्लंड
विजेते - वेस्ट इंडिज (कर्णधार - स्टेफानी टेलर)
उपविजेते - ऑस्ट्रेलिया
विजेते - ऑस्ट्रेलिया (कर्णधार - मेग लॅनिंग)
उपविजेते - इंग्लंड
विजेते - ऑस्ट्रेलिया (कर्णधार - मेग लॅनिंग)
उपविजेते - भारत
विजेते - ऑस्ट्रेलिया (कर्णधार - मेग लॅनिंग)
उपविजेते - दक्षिण आफ्रिका
विजेते - न्यूझीलंड (कर्णधार - सोफी डिवाईन)
उपविजेते - दक्षिण आफ्रिका
विजेते - ऑस्ट्रेलिया (कर्णधार - सोफी मोलिनेक्स)
उपविजेते - इंग्लंड