पौड : मुळशी तालुक्यात धरण भागात अतीमुसळधार पाऊस सुरू आहे. डोंगरवाडी येथील प्लस व्हॅली पॉईंटजवळ डोंगरावरचे पाणी रस्त्यावर आले आहे. आदरवाडी येथे रस्तावरुन येणारा पाण्याचा प्रवाह तसेच दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन दक्षतेचा उपाय म्हणून पौडमार्गे माणगावकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग पुढील सूचना येईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केल्याची माहिती तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी दिली.
अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तहसील कचेरीतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क आहे. गावचे पोलिस पाटील, सरपंच, नागरिक यांनी दक्ष राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही चौबे यांनी केले आहे.