Pune School: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
Saam TV July 06, 2026 03:45 AM
  • हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

  • पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

  • जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याची माहिती दिली.

हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

School Holiday: मोठी बातमी! ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी

नागरिकांनाही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाले व धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे तसेच स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे. आदेशानुसार, संभाव्य अतिवृष्टी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) क्षेत्रातील सर्व अंगणवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सोमवारी रोजी सुट्टी राहील.

Maharashtra Rain Alert: पुढील 24 तास अतिधोक्याचे, मुंबई-कोकणला ऑरेंज,रायगड-पुणे-नाशिक घाटमाथ्याला रेड अलर्ट

विद्यार्थ्यांच्यासुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. परंतु सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजासाठी सज्ज राहावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई पुन्हा हादरली! तीन मजली बांधकाम कोसळलं, 3 जण अडकले; रेस्क्यू ऑपरेशन सुरू ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर

ठाणेजिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस होतोय. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनीही ६ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.