मुंबई : मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक भागात झाड, विजेच्या तारा, घराचे छत, पत्रे कोसळत असल्याच्या घटना घडत आहेत. याघटनांमध्ये काही जण जखमी तर काहींचा दुर्दैवी मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच मुंबईतील मानखुर्द येथे चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मुसळधार पावसादरम्यान मुंबईतील मानखुर्दभागात चार मजली चाळीचा काही भाग कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रात्री साडेआठच्या सुमारास हनुमान मंदिराच्या मागे असलेल्या जनता नगरमधील चाळ क्रमांक ५ येथे घडली. तळमजला आणि वर तीन मजले असलेल्या या इमारतीचा काही भाग अचानक कोसळला, ज्यामुळे लोक ढिगाऱ्याखाली अडकले.
Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! शिवसेना नेत्याच्या कार्यालयावर भलंमोठं झाड कोसळलं; झाडांचा प्रश्न ऐरणीवरप्राथमिक माहितीनुसार, मुंबईतीलमानखुर्द परिसरातील जनता नगर येथे भुईमजला अधिक तीन मजली (ग्राउंड प्लस थ्री) इमारतीमधील दोन ते तीन निवासी गाळे कोसळले. घटनेनंतर लगेचच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी अडकलेल्यांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले.
या घटनेत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. एकूण सहा मृतांमध्ये दोन पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. पाचजणांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात तर एकाचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. तर या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, इमारतीचा काही भाग अचानक कोसळल्यामुळे परिसरात घबराट पसरली. स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्यात गुंतलेल्या पथकांना सहकार्य करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला.
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाकण-नागोठणे दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगादरम्यान, मुंबई महानगरपालिका (बीएमसी) प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इमारतीतील दोन ते तीन झोपड्यांचा भाग कोसळल्याने हा अपघात घडला. दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलिस आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असून, ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.