LIVE: मुंबईच्या मानखुर्द परिसरात तीन मजली चाळ कोसळली
Webdunia Marathi July 06, 2026 03:45 PM

Maharashtra Breaking News Live in Marathi :  मुंबईच्या मानखुर्द परिसरात मुसळधार पावसात तीन मजली चाळ कोसळून किमान ६ जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मानखुर्दच्या जनता नगर परिसरात घडली. महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.

मुंबईतील मानखुर्दमध्ये मुसळधार पावसात तीन मजली चाळ कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा

 

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याच्या भोकरबर्डी गावात एक जीर्ण झालेला विजेचा खांब बैलगाडीवर कोसळल्याने, विजेचा धक्का लागून एक शेतकरी दाम्पत्य आणि दोन बैल ठार झाले. अशी माहीत समोर आली आहे. सविस्तर वाचा

भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर, खबरदारीचा उपाय आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून, शहरातील सर्व सरकारी, खाजगी आणि महानगरपालिका-संचालित शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीएमसीने स्पष्ट केले आहे की हा निर्णय केवळ शैक्षणिक संस्थांना लागू आहे. सविस्तर वाचा

भूस्खलनामुळे भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाने अनेक गाड्या रद्द केल्या आहे आणि अनेक गाड्यांचे मार्ग बदलले आहे. सविस्तर वाचा

कुर्ला येथे मुसळधार पावसात झाड कोसळून एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. महापौर रितू तावडे यांनी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. सविस्तर वाचा

मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावरील विमानसेवेच्या वेळापत्रकात व्यत्यय आला
मुंबईतील मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि कमी दृश्यमानतेमुळे विमानतळाची धावपट्टी एक तासासाठी बंद करण्यात आली. ८७% विमानांना विलंब झाला आणि प्रवाशांना ७५ मिनिटांपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

देशभरात तांत्रिक शिक्षणावर मोठी कारवाई झाली आहे. नियमांचे उल्लंघन आणि विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळे एआयसीटीईने ५८ अभियांत्रिकी महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहे. सविस्तर वाचा

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सोमवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा विभागाने दिला आहे. सविस्तर वाचा

पुण्यात भूस्खलनामुळे घर कोसळले; शाळा आणि महाविद्यालये बंद, हवामान खात्याचा इशारा

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पुण्यातील पाटण येथील एका लहान, दुर्गम गावात सोमवारी सकाळी भूस्खलन झाले, ज्यात एक घर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. 

 

प्राथमिक माहितीनुसार, घरात राहणारे संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. पुणे जिल्हा माहिती कार्यालयानुसार, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पुणेस्थित राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) ५ व्या बटालियनकडून मदत मागण्यात आली आहे. त्यानुसार पथक तैनात करण्यात आले.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.