Dombivli Fire: कैलास लस्सीच्या दुकानाला आग! कर्मचाऱ्यांनी खिडकीतून मारल्या उड्या; Video Viral
esakal July 06, 2026 08:45 PM

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील कैलास लस्सी स्वीट मार्टच्या पहिल्या मजल्यावरील किचनमध्ये सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यावेळी किचनमध्ये काम करणाऱ्या सात ते आठ कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत खिडकीतून बाहेर पडून स्वतःची सुटका केली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

आगीची माहिती मिळताच डोंबिवलीअग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली. त्यामुळे आगीचा प्रसार होण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठे नुकसानही झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

Mumbai Weather: मुंबईत ८० किमी वेगाने वारे वाहणार; क्रेन, मचानबाबत पालिकेचे बिल्डर्स कंत्राटदारांना 'हे' कडक नियम जारी

प्राथमिक तपासात इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आगलागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, हे दुकान मध्य रेल्वे मार्गालगत असल्याने आगीचा धूर आणि ज्वाळा रेल्वे प्रवाशांच्या नजरेस पडल्या. काही प्रवाशांनी या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण केले. कर्मचाऱ्यांनी खिडकीतून बाहेर पडत केलेल्या सुटकेचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत.

Mumbai Rain: मुंबईची तुंबई! बेस्टची सेवा विस्कळीत, अनेक मार्गात बदल; वाचा सविस्तर

आगीमुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग लवकर आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.