Cristiano Ronaldo : भावनिक क्षण! ख्रिस्तियानो रोनाल्डो रडला... मैदानावर एकटा उभा राहिला; फुटबॉलविश्व स्तब्ध Video
esakal July 07, 2026 06:45 AM

Cristiano Ronaldo cries after Portugal World Cup exit: फुटबॉलविश्वातील महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याचे वर्ल्ड कप उंचावण्याचे स्वप्न अखेर अपूर्ण राहिले... स्पेनच्या मिकेल मेरिनोने ९०+१ मिनिटाला गोल करून पोर्तुगालला १-० असा पराभव पत्करण्यास भाग पाडले. रेफरीने मॅच संपल्याची शिटी वाजवताच स्पेनचे खेळाडू जल्लोष करत होते, तेच रोनाल्डो गुपचूप एकटा चालताना दिसला. त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. त्याला ढसाढसा रडून मन मोकळं करायचं होतं, परंतु त्याने स्वतःच्या भावनांना आवर घातला... प्रेक्षकांचे आभार मानले अने काही काळ संपूर्ण स्टेडियमभर नजर फिरवली अन् पॅव्हेलियनच्या दिशेने निघून गेला.

पोर्तुगालचा सर्वकालीन महान फुटबॉलपटूचा हा शेवटचा वर्ल्ड कपअसल्याची चर्चा आहे. कारण तो सध्या ४१ वर्षांचा आहे आणि २०३०च्या वर्ल्ड कपपर्यंत तो ४५ वर्षांचा होईल. रोनाल्डोने सहा वर्ल्ड कप स्पर्धेत २७ सामन्यांत पोर्तुगालकडून सर्वाधिक ११ गोल केले. सलग सहा वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये गोल करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. रोनाल्डोने या वर्ल्ड कप स्पर्धेत १७ ऑन टार्गेट शॉट्स घेतले आणि सहकाऱ्यासाठी एकही संधी निर्माण न करता. १९९८ मध्ये मेक्सिकोच्या अल्बर्टो गार्सिा अॅस्पे यांनी १५ शॉट्स घेतले होते. तो विक्रम रोनाल्डोने या वर्ल्ड कपमध्ये मोडला.

२०१० मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या स्पेनला त्यानंतर केव्हाच उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नव्हती आणि त्यांनी हा पल्ला आज गाठला. त्यांनी सलग ६०० मिनिटे एकही गोल खाल्ला नाही आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील हा विश्वविक्रम आहे. यापूर्वी स्वीत्झर्लंडने ५५७ मिनिटे प्रतिस्पर्ध्यांना एकही गोल करू दिला नव्हता.

Portugal vs Spain : स्वप्न तुटले! ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वर्ल्ड कप प्रवास संपला! पोर्तुगालला माजी विजेत्या स्पेनकडून पराभवाचा धक्का
  • ६ वेगवेगळ्या फिफा विश्वचषकांमध्ये गोल करणारा आतापर्यंतचा पहिला खेळाडू.

  • वर्ल्ड कप आणि युरो स्पर्धांमध्ये मिळून २५ पेक्षा जास्त गोल करणारा पहिला खेळाडू.

  • वर्ल्ड कपच्या बाद फेरीतील सर्वात वयस्कर गोल करणारा खेळाडू.

  • या स्पर्धेतील पोर्तुगालचा आतापर्यंतचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.