FIFA World Cup 2026 – माझा हा शेवटचा वर्ल्ड कप असेल, पण…; नेमारनंतर रोनाल्डोनेही दिले निवृत्तीचे संकेत
Marathi July 07, 2026 07:25 AM

ब्राझीलच्या पराभवानंतर नेमारने निवृत्ती पत्करली. पण त्यानंतर अवघ्या क्रीडा विश्वाच्या गळ्यातील ताईत असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोनेही निवृत्तीचे संकेत दिले आहेत. कारण स्पेनविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये रोनाल्डोने याबाबतचे संकेत दिल्याचे म्हटले जात आहे.

स्पेनविरुद्धच्या 16 संघांच्या फेरीतील सामन्यापूर्वी रोनाल्डोने कारकिर्दीच्या समाप्तीबद्दल भाष्य केले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्याने सांगितले की, हा विश्वचषक त्याचा शेवटचा असेल.

रोनाल्डो निवृत्तीबाबत काय म्हणाला

रोनाल्डोने एका पत्रकार परिषदेत सांगितले की,  अखेर तो दिवसही समीप आला आहे, असे मला वाटते. मला या सामन्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे, कारण हा माझा शेवटचा विश्वचषक असणार आहे. पण मला आशा आहे की हा माझा शेवटचा सामना ठरणार नाही!

स्पेनविरुद्धच्या सामन्याबाबत म्हणाला

रोनाल्डो म्हणाला की, स्पेनविरुद्धच्या सामन्यात काहीही झाले तरी मी पूर्णपणे समाधानी होऊनच निवृत्त होईल. खरं सांगायचं तर या सामन्यात काहीही झालं तरी मी इथून पूर्ण समाधानानेच निरोप घेणार आहे. 100 टक्के नाही तर 1000 टक्के. कारण मी फुटबॉलला सर्वस्व दिलं आहे. मला कशाचाही पश्चात्ताप होणार नाही. मी एक चांगलं आयुष्य जगतो. पण माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुटबॉल. मी फुटबॉल खेळतो कारण माझं त्यावर प्रेम आहे!

देवाचे आभार मानले

रोनाल्डोने 2003मध्ये पदार्पण केले आणि तो पोर्तुगालचा आतापर्यंतचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला. त्याने 232 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 146 गोल केले. रोनाल्डो देवाचे आभार मानत म्हणाला, माझ्याकडे कशाचीही कमतरता नाही. मी विश्वचषक जिंकलो किंवा नाही, तरीही देव माझ्यावर खूप उदार आहे!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.