Aadhaar DBT to Account: आधार कार्ड ओळखीचा वैध पुरावा ग्राह्य धरावा की नाही यावरून सतत वाद होतो. आता आधार कार्डचं तितकं अप्रुप राहिलं नाही. पण आधार आता केवळ पुराव्याचाच भार राहिला नाही तर व्यवहार करण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरत आहे. अनेक सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड नोंद करणे गरजेचे असते. अनेक ठिकाणी आधार कार्डच्या मदतीने पैसे काढून मिळतील. इतर खात्यात हस्तांतरीत करून मिळतील असा फलक तुम्ही पाहिला असेल. ना दलाल, ना उशीर, आधार कार्डच्या मदतीने खात्यात झटपट पैसा येतो कसा? एका क्लिकवर जाणून घ्या.
आधार कार्ड का गरजेचे?
आधार कार्ड 12 अंकांचा एक युनिक ओळख क्रमांक आहे. Unique Identification Authority of India -UIDAI आधार कार्ड देते.
या कार्डमध्ये बायोमॅट्रिक माहिती जशी फिंगरप्रिंट, आयरिस आणि डेमोग्राफिक्स माहिती नाव, पत्ता यांची सर्व माहिती असते.
सरकारी योजनामध्ये आधारचा वापर करण्यात येतो. त्याआधारे देशातील प्रत्येक व्यक्तीची ओळख होते
सरकारी योजनांमध्ये बोगस लाभार्थी घुसणार नाही. दुहेरी फायदा कोणी घेणार नाही.
DBT काय आहे?
DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर एक खास सिस्टिम आहे. सरकार जी सबसिडी, पेन्शन, शिष्यवृत्ती, एखादी मदत ही थेट बँकेत हस्तांतरीत करण्यात येते. भ्रष्टाचार कमी व्हावा आणि बोगस लाभार्थ्यांना आळा बसावा आणि पारदर्शकता राहावी यासाठी ही प्रक्रिया राबवली जाते.
पैसे थेट खात्यात येतो कसा?
यासाठी आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. आधार कार्ड सेटिंगद्वारे ही प्रक्रिया अगोदरच राबवली गेली आहे. या प्रक्रियेमुळे सरकारी योजनांच्या पात्र व्यक्तींचे नाव DBT पोर्टलशी जोडल्या जाते. बँक खाते NPCI (National Payments Corporation of India) राष्ट्रीय देयके महामंडळाच्या सिस्टिमसोबत जोडल्या गेलेले असते. या पद्धतीने पात्र व्यक्तीच्या आधार कार्डशी संबंधित बँक खात्यात थेट पैसा जातो. जेव्हा सरकारी एखाद्या योजनेतंर्गत पैसा पाठवते. तेव्हा ती रक्कम थेट DBT सिस्टिमने जाते. तर NPCI च्या मदतीने थेट योग्य व्यक्तीच्या बँक खात्यात रक्कम जमा होते. बँक खात्यात रक्कम जमा होताच लाभार्थ्याला SMS येतो.
तर दुसऱ्या पद्धतीत आधार कार्ड हे तुमच्या बँकेशी लिंक केलेले असते. त्याचवेळी ते तुमच्या नोंदणीकृत मोबाईलशी जोडलेले असते. त्याआधारे महाईसेवा केंद्रातील व्यक्ती तुमच्या खात्यातून ती रक्कम काढून देण्यास मदत करते. अथवा ती रक्कम इतर खात्यावर हस्तांतरीत करते. त्याचा एसएमएसही तुमच्या मोबाईलवर येतो. या सेवेसाठी शुल्क आकारले जाते.