18 जून रोजी केतन अग्रवाल या 25-26 वर्षांच्या तरूणाची लोहगडावरून खाली दरीत ढकलून हत्या करण्यात आली. त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनीच हे हादरवणारं कृत्य केल्याचं समोर आलं. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांनी खुनाची कबुलीही दिली आहे. सध्या ते दोघेही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
एवढंच नव्हे तर महिला आरोपींना पोलिस कशी वागणूक देतात, पोलीस कोठडीत महिला आरोपींना मारहाण होते का , तपासात कोणते प्रश्न विचारले जातात आणि सोनम रघुवंशी हिला जामीन कसा मिळाला, अशा स्वरुपाची माहिती सिया गोयलने वेगवेगळ्या माध्यमांतून मिळविण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती समोर आली आहे.