Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; उद्याही शाळांना सुट्टी मिळणार का?
Saam TV July 07, 2026 08:45 PM
  • पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

  • नाशिकमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रोहा आणि चिपळूण परिसरात अतिवृष्टीचा धोका कायम आहे.

महाराष्ट्रात पावसानं सध्या धुमाकूळ घातलाय. नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. रोहा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, चिपळूण या ठिकाणी महापुराचं सावट आहे. तर मुंबई आणि उपनगरांत पावसाने तूर्तास विश्रांती घेतली आहे. इथे ६० ते ७० किमी ताशी वेगानं वादळी वारे सुरू आहेत.

Monsoon Rain: 80 किमी वेगाचं वादळ अन् ढगांचा गडगडाट; महाराष्ट्रासह २१ राज्यात पुढील ५ दिवस 'जोर'धार पाऊस, IMDचा अलर्ट

आजही राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिकमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात काल रात्री पासूनच अतीमुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी मिळेल का असा प्रश्न पालकांकडून विचारला जातोय.

गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुंबई, कोकण, ठाणे आणि पुणे, नाशिक भागात जोरदार पाऊस होतोय. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली होती. आता पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस होईल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय. त्यामुळे उद्याही शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असेल का असा प्रश्न केला जातोय.

Local Train Update : मुसळधार पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत, पश्चिम रेल्वे १ तास उशिराने; मध्य आणि हार्बर मार्गावर काय परिस्थिती?

दरम्यान नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलीय. त्र्यंबकेश्वर आणि आसपासच्या परिसरात होत असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्र्यंबकेश्वर-खोडाळा मार्गावरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या बाजूला मातीचा भराव टाकून तयार करण्यात आलेला कच्चा पूल पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे वाहून गेलाय.

पालघर, नारशक घाट, रायगड, रत्नारगरी, कोल्हापूर घाट, ब लढाणा, अकोला, अमरावती, वर्धा यासाठी उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नारगरी, सातारा घाट, पुणे घाट, यवतमाळ, चुंद्रपूर, गडरचिरोली, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर , गडरचरोली आदी जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.