मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आज आमदारांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर ठाकरेंनी ही पहिलीच बैठक बोलावली आहे. या बैठकीला खासदार संजय राऊत देखील उपस्थित आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला आमदार राहुल पाटील वगळता सगळे आमदार उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. आमदार राहुल पाटील यांच्या घरी कार्यक्रम असल्याने ते परभणीत आहेत. त्यांनी तसं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवल्याची माहिती सचिन अहिर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांना नेमक्या काय सूचना देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
1) नितीन देशमुख
2) सुनील राऊत
3) भास्कर जाधव
4) बाळा नर
5) अंबादास दानवे
6) ज मो अभ्यंकर
7) मनोज जामसुतकर
8) अनिल परब
9) हारून खान
10) महेश सावंत
11) संजय देरकर
12) अजय चौधरी
13) वरुण सरदेसाई
14) दिलीप सोपल
15) सिद्धार्थ खरात
16) सुनील शिंदे
17) बाबाजी काळे
18) गजानन लवटे
19) कैलास पाटील
20) प्रवीण स्वामी
21) सुनील प्रभू