Maharashtra Heavy Rain : गेल्या जून महिन्यात रुसून बसलेल्या पावासाने जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मात्र एकच दाणादाण (Heavy Rain) उडवून दिली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्याला पावसाने (Maharashtra Heavy Rain) अक्षरशः झोडपून काढले आहे. तर अनेक नदी नाले ओसंडून वाहत असताना जनजीवनही विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. असं असलं तरी महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) बहुतांश जिल्ह्यात आद्यपही समाधानकारक पाऊस न पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे बळीराजा काहीसा अडचणीत आला आहे. दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला गेल्या तीन दिवसापासून झोडपून काढलेल्या पावसाने सध्या काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु पुन्हा सुरु झाल्या आहेत. तर तिकडे नाशिकमध्येही अतिवृष्टीचा संभाव्य धोका टळला आहे. (Maharashtra Heavy Rain)
Nashik Rain : नाशिक शहरातील शाळा महाविद्यालय आजपासून पूर्ववत
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुका परिसरात ढगफुटीचा इशारा देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून नाशिक शहरासह जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. अशातच आता हा ढगफुटीचा धोका टळला असून पावसाचा जोर कमी झालाय. त्यामुळे नाशिक शहरातील शाळा महाविद्यालय आजपासून पूर्ववत सुरू झाले आहेत. तर पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांमध्ये सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आजही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर आठवीपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वर्ग पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत.
Nashik Rain News : अतिवृष्टीचा संभाव्य धोका टळला, मात्र त्र्यंबकेश्वर मंदिर अद्याप बंदच
दरम्यान, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आज सकाळपासून पुन्हा एकदा मंदिर भाविकांसाठी खुल करण्यात आल आहे. परंतु त्याच वेळेस साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असणार सप्तशृंगी मातेचे मंदिर आज आणि उद्या ही बंद राहणार आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळ, धबधबे, गड किल्ले हे 13 जुलै पर्यंतबंदी कायम आहे.त्यामुळे ढगफुटीच्या इशारा नंतर नाशिक शहरात पावसाचा जोर वाढला होता. सध्या पावसाचे प्रमाण कमी।असल्याने काही निर्बंधांमध्ये शिथिलता बघायला मिळते तर काही निर्बंध कायम असल्याचं निदर्शनास येत आहे
Mumbai Rain: तीन दिवस मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबईला काहीसा दिलासा
सलग तीन दिवस मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबईला काहीसा दिलासा मिळाला आहे. पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईत सध्या पावसाने विश्रांती घेतली असून अनेक ठिकाणी उघडीप दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी हवामान विभागाने पुढील काळात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली असल्याने प्रशासन सतर्क आहे. तर ठाण्यामध्ये पुन्हा एकदा मागील अर्ध्या तासापासून पावसाने जोर पकडला आहे. ठाण्यात पावसाने रात्री विश्रांती घेतली होती. मात्र आता सकाळी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय. तिकडे पालघर जिल्ह्यात काल रात्री सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली असून अधून मधून पावसाची रिप रिप सुरू आहे. तर रायगडमध्ये पाऊस थांबलेला आहे. मात्र सावित्री, कुंडलिका नद्या धोका पातळीच्या वर असून पाताळगंगेची वाटचाल आता धोका पातळीकडे जात आहे.
लोकल गाड्या नियमितपणे सुरू, पण प्रवास सुरू करण्यापूर्वी रेल्वेची माहिती घेऊन घराबाहेर पाडा
दुसरीकडे, पालघर जिल्ह्याला आज येलो अलर्ट असून आज जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून शाळा महाविद्यालय अंगणवाड्यांना सुट्टी घोषित केले आहे. तर चर्चगेट–विरार मार्गावरील सर्व मुंबई उपनगरीय लोकल गाड्या नियमितपणे सुरू आहेत. पश्चिम रेल्वेची पथके सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास कार्यरत आहेत. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासावी.
इतर महत्वाच्या बातम्या