India-Indonesia : एका ब्रह्मोस मिसाइलची किंमत किती? या डीलमुळे कुठला देश इंडोनेशियाच्या वाट्याला जाण्याआधी 10 वेळा विचार करेल
Tv9 Marathi July 08, 2026 11:45 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात काही महत्वाचे संरक्षण करार होणार आहेत. दोन्ही देशांमध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाइल कराराची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. हा करार भारताच्या Act East Policy साठी मैलाचा दगड ठरणार आहे. या करारामुळे दक्षिण चीन समुद्र आणि हिंद महासागर क्षेत्रात भू-राजकीय समीकरणं बदलणार आहेत. संरक्षण एक्सपर्ट आणि संरक्षण मंत्रालयाच्या आकड्यांनुसार एका ब्रह्मोस मिसाइलची किंमत अंदाजे $3.5 मिलियनच्या (अंदाजे 29 ते 30 कोटी रुपये) घरात आहे. याच मिसाइलची एडवान्स रेंज अधिक लांब पल्ल्यापर्यंत हल्ला करणाऱ्या वेरिएंटची ब्रह्मोस-ER (Extended Range) किंमत जवळपास $4.85 मिलियनच्या (जवळपास 40 कोची रुपये)घरात आहे.

जेव्हा कुठला एक देश दुसऱ्या देशाबरोबरमिसाइलप्रणाली खरेदीचा करार करतो, तेव्हा त्यात केवळ मिसाइलचा समावेश नसतो. यात मोबाइल ऑटोनॉमस लॉन्चर्स, रडार सिस्टम, कमांड अँड कंट्रोल सेंटर, ऑपरेटर ट्रेनिंग, मेंटेनेंस आणि लॉजिस्टिक्स सपोर्टचा सुद्धा समावेश असतो. इंडोनेशिया सोबत होणारा हा संरक्षण करार जवळपास $200 मिलियन ते $450 मिलियनच्या घरात आहे. भारत मिसाइलसह संपूर्ण किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी सिक्योरिटी सिस्टिम प्रदान करेल. भारत आणि इंडोनेशियामधील ही मिसाइल डील केवळ व्यापारिक करार नाही, तर सखोल रणनितीक आणि कूटनितीक अर्थ त्यामध्ये दडलेले आहेत.

अजून किती देशांना इंटरेस्ट?

इंडोनेशिया एक विशाल बेट समूह आहे. त्यांच्याकडे जगातील महत्वाचा व्यापारी समुद्री मार्ग आहे. मलक्का, सुंडा, लोंबोक आणि मकासर सारखे समुद्री चोक पॉइंट्स इंडोनेशियाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. या क्षेत्रातील चीनची वाढती आक्रमकता लक्षात घेता ब्रह्मोस मिसाइलच्या तैनातीमुळे इंडोनेशियाची ताकद अजून वाढेल. फिलीपिंस नंतर इंडोनेशिया भारताकडून ब्रह्मोस खरेदी करणारा दुसरा आसियान देश आहे. त्याशिवाय वियतनाम, मलेशिया आणि थायलंड या देशांनी सुद्धा ब्रह्मोस खरेदीत रस दाखवला आहे. हे करारही पूर्णत्वाला गेले तर चीनला दक्षिण चीन समुद्रात भारताच्या मिसाइल सिस्टिममुळे एक आव्हान निर्माण होईल. चीन आक्रमकता दाखवण्याआधी नक्कीच विचार करेल.

रेकॉर्ड संरक्षण साहित्य निर्यात

भारत सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये ₹38,424 कोटींच रेकॉर्ड संरक्षण साहित्य निर्यात केलं. ब्रह्मोस सारख्या अत्याधुनिक निर्यातीमुळे जगातील शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेत भारत एक विश्वसनीय आणि बिगर पाश्चिमात्य देश म्हणून स्वत:ला स्थापित करु शकतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.