Akshay Kumars Welcome To The Jungle: अक्षय कुमार स्टार (Akshay Kumar) 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the jungle) या कॉमेडी सिनेमाने (Comedy Film) प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. केवळ विकेंड नाही तर, विकडेजमध्येही या सिनेमाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. या अॅक्शन अॅडव्हन्चर फिल्मने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. दमदार कमाई करत या सिनेमाने दुसऱ्या विकेंडमध्ये जबरदस्त एन्ट्री केली आहे. दरम्यान, दुसऱ्या सोमवारी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. 10 दिवसांत या सिनेमाने 90 कोटींचा टप्पा पार केला. आतापर्यंत या सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केला असून, 12 व्या दिवशी या सिनेमाने किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
फॅमिली ऑडियन्सकडून 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. अहमद खान दिग्दर्शित हा सिनेमा 'वेलकम' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या सिनेमात अक्षय कुमार व्यतिरिक्त सुनील शेट्टी, परेश रावल, रविना टंडन, राजपाल यादव आणि दिशा पटानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. विशेष म्हणजे या सिनेमात 30 कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाने 93.15 कोटींचे कलेक्शन केले आहे.
यानंतर 8व्या दिवशी 4.50 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर, 9 व्या दिवशी 7.50 कोटी कमावले. 10 व्या दिवशी या सिनेमाने 9.75 कोटींचे कलेक्शन केले. तसेच 11 व्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. 11 व्या दिवशी या सिनेमाने 2.65 कोटी कमावले. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाने 12 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी 3 कोटी कमावले. म्हणजेच 12 दिवसांत या सिनेमाने 120.55 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'वेलकम टू द जंगल' ही फिल्म अवघ्या 125 कोटी रुपये बजेटमध्ये तयार झाली आहे. 12 दिवसांत या सिनेमाने 96.44 टक्के खर्ज वसूल केला आहे. दरम्यान, सक्सेसफूल होण्यासाठी या सिनेमाला आणखी 5 कोटी कमावणे गरजेचं आहे. येत्या काही दिवसांत हा सिनेमा 150 कोटींचा टप्पा पार करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, 2026मध्ये 'भूत बंगला'नंतर 'वेलकम टू द जंगल' हा सिनेमा अक्षय कुमारच्या हिट चित्रपटांच्या लिस्टमध्ये अॅड करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रसिका सुनीलचं साऊथमध्ये पदार्पण, पिंक साडीतील ग्लॅमरस लूकने वेधलं लक्ष