एक दिवसाचे मुख्यमंत्री बनल्यास काय करणार? तुकाराम मुंडे यांचे बेधडक उत्तर, थेट…
Tv9 Marathi July 08, 2026 01:45 PM

धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंडे सध्या तूफान चर्चेत आहेत. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया होत आहेत. कधी भेसळयुक्तांवर कारवाई तर कधी बड्या हॉटेल आणि रेस्टारंटवर कारवाई त्यांच्याकडून सुरू आहे. ज्यामुळे भेसळयुक्तांचे धाबे दणाणली आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत. हॉटेलमधील किचनमध्ये घाण दिसली की, थेट कारवाई होतंय. कोणाचीही गय केली जात नाही. यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाने जितक्या कारवाया केल्या नाहीत, तेवढ्या कारवाया तुकाराम मुंडे यांनी आपल्या हातात पदभार स्वीकारल्यापासून केल्या जात आहेत. फक्त मुंबई, पुणे नाशिकच नाही तर राज्यभरात या कारवाया होत आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून तुकाराम मुंडेंचे काैतुक केले जात आहे. पनीर, दूध, दही सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ सुरू होती.

भेसळ करणाऱ्यांना सळो की पळो करून तुकाराम मुंडे यांनी सोडले. यादरम्यानच तुकाराम मुंडे यांची बदली होणार अशी जोरदार चर्चा रंगताना दिसली. ज्यानंतर लोक थेट याचा विरोध करताना दिसले. अखेर सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, तुकाराम मुंडे यांनी बदली होणार नाही. तसा काही निर्णय नाही किंवा हालचालीही नाही. तुकाराम मुंडे आज जनतेच्या मनातील नायक आहेत.

नुकताच तुकाराम मुंडे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी प्रश्न विचारण्यात आला की, तुम्हाला नायक चित्रपटासारखे एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनवले आणि सगळे अधिकार दिले तर तुम्ही काय कराल? यावर तुकाराम मुंडे यांनी म्हटले की, लोकशाहीत असे अमर अधिकार कुणालाही नसतात. मी नेहमी सांगतो की, एक शासकीय कर्मचारी म्हणून आपले काम वरच्या स्तराला नेले पाहिजे.

ताकद देणे, मार्गदर्शन करणे, समाज जेवढा विकसित होईल तेवढा आपला देश आणि देशातील व्यक्ती विकसित होईल. मला कोणताही रोल दिला तरीही पुढचा एक इंच कसा वाढले आणि पारदर्शक करा असेल. काम झाले पाहिजे. मी एक शासकीय नोकर आहे. मला माझ्या मर्यादा नक्कीच माहिती आहेत. मला जर लोक नायक म्हणत असतील तर मी त्यांचा आभारी आहे. तुकाराम मुंडे गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने कारवाया करत आहेत, त्यावरून लोकांच्या मनात त्यांची एक वेगळीच झाप पडली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.