Mohan Babu Life Story: तेलुगु अभिनेते मोहन बोबू (Mohan Babu) आता कोट्यवधींच्या मालमत्तेचे (Telugu Actor) मालक आहेत. पण त्यांनी आपल्या कारकिर्दीत बरेच चढ उतार पाहिले. एक काळ असा होता (Entertainment), जेव्हा ते एका शाळेत पी.टी (फिजिकल) टीचर म्हणून कार्यरत होते. ते महिन्याला 40 रुपये कमावत होते. पण आज ते तेलुगु सिनेमातील दमदार कलाकारांपैकी एक आहे. त्यांची कारकिर्द कशी होती? पी.टी टीचर ते सुपरस्टार होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता? जाणून घेऊयात.
मोहन बाबू यांनी आपल्या सुरुवातीच्या खडतर काळात बरेच हाल सोसले. सुरुवातील त्यांच्याकडे एक जोडी कपडे होते. बऱ्याचदा त्यांना पोट भरुन जेवणही परवडतही नव्हते. पण आज त्यांच्या अथक परिश्रमाच्या जोरावर मोहन बाबू यांचा हैदराबाद येथे मोठी इस्टेट आहे. हैदराबाद येथील जलपल्ली येथे साधारण 10 एकर जमीन आहे. त्या 10 एकरवर त्यांचे सुंदर घर आहे. त्यांचे सुंदर घर लग्झरी रेसॉर्टपेक्षा कमी नाही. जबरदस्त लॉन, इन्फिनिटी स्विमिंग पूल, अवॉर्ड्स गॅलरी, प्रायव्हेट होम थिएटर आणि शेतीसाठी मोठा एरिया उपस्थित आहे.
कर्ली टेल्ससोबत बोलताना मोहन बाबू यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 'माझे वडील शिक्षक होते. मी पण एक वर्ष टीचरचा जॉब केला. त्यांनी मला शिस्तीचे महत्त्व शिकवले. माझी सर्वात मोठी कमजोरी स्पष्टवक्तेपणा आहे. मला पटकन राग येतो', असं मोहन बाबू म्हणाले. 'मी एका कार शेडमध्ये दिवस काढले आहेत. इथे ना शौचालय होते ना बाथरुम. माझ्या घरात जास्त कुणी येत नव्हते'.
'माझा तो काळ स्ट्रगल पिरिएड होता. माझी तेव्हा विशेष ओळख नव्हती. मागील 55 वर्षांपासून मी अविरत काम करत आहे. अशाही काही दिवसांचा मी सामना केला, जेव्हा मला जेवायला अन्नही मिळत नव्हते. केवळ पाणी पिऊन मी झोपत होतो. मी माझ्या आयुष्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे', असं म्हणत त्यांनी खडतर प्रवासाबाबत सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'देऊळ बंद 2'वर स्वामींची कृपा; 10 कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमानं किती प्रॉफिट कमावला?