Tarak Mehta ka Ooltah Chashma fame Munmun Dutta on Baruipur: तारक मेहता का उल्टा चष्मा फेम (tarak Mehta ka ooltah chashna) मुनमुन दत्ता (Munmun Datta) सध्या कोलकाता येथील बारुईपुरच्या अत्याचार प्रकरणावर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चेत आहे. तिनं संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना गुन्हेगारांना शोधून मुलीला न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले आहे. तिनं या प्रकरणाच्या संबंधित पोस्ट शेअर करुन संताप व्यक्त केलाय. मुनमुन दत्ताची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनीही गुन्हेगारांविरोधात संताप व्यक्त केला आहे. कोलकाताच्या बारुईपुरचं नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊयात.
कोलकात्याच्या दक्षिण उपनगरातील बारुईपुर परिसरात 5 जुलै रोजी धक्कादायक घटना घडली. एका 12 वर्षीय मुलीचा तलावात गोणीत भरलेला मृतदेह आढळला. माहितीनुसार, 4 जुलैपासून ती मुलगी बेपत्ता होती. पीडित मुलगी सापडल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. दरम्यान, मृत मुलीच्या कुटुंबाने गंभीर आरोप केला आहे. मृत मुलीवर आधी बलात्कार झाला नंतर तिची हत्या करण्यात आली, असं त्यांनी म्हटलंय. मिळालेल्या माहितीनुसार, 5 जुलै रोजी त्या निष्पाप मुलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन प्रतिक्रिया पार पडली.
6 जुलै रोजी पोलिसांना पीडित मुलीचा शवविच्छेदन अहवाल मिळाला असून, या रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी पॉक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. 6 जुलै रोजी बारुईपुर पोलिसांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील 3 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तसेच या तिन्ही पोलीस ठाण्यात एकाचवेळी 5 हून अधिक लोकांना एकत्र उपस्थित राहण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
या प्रकरणाच्या निषेधार्थ अभिनेत्री मुनमुन दत्ता हिनं पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टवर अभिनेत्रीने लिहिले की, 'बारुईपुर प्रकरणात न्याय हवा', असं पोस्टवर लिहिण्यात आलं आहे. तसेच या पोस्टवर अभिनेत्री म्हटले की, '12 वर्षांची एक मुलगी, एक लहानशी चिमुकली. जिच्यावर लैंगिक अत्याचार आणि गोणीत भरुन हत्या करण्यात आली. नराधमांना शोधा', असं तिनं आपल्या पोस्टवर म्हटलं आहे. माहितीनुसार, मुलीवर अत्याचार करणारे 4 तरुण होते. पोलिसांनी आरोपी प्रभास मंडलसह तीन जणांना अटक केली आहे. सध्या परिसरात संतापाची लाट असून, नागरिकांनी नराधमांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'देऊळ बंद 2'वर स्वामींची कृपा; 10 कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमानं किती प्रॉफिट कमावला?