केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी सुमारे चार महिन्यांपूर्वी गुपचूप विवाह केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपींच्या मोबाईल फोनमधील व्हॉट्सअॅप चॅट, फोटो आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या तपासातून हा महत्त्वाचा धागा हाती लागल्याचे समजते.
एका लॉजमध्ये चेतनने सियाच्या कपाळावर कुंकू लावलं भरला. तपास अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहेत. प्राथमिक तपासात व्हॉट्सअॅपवरील संभाषणे, एकमेकांना केलेले संदेश, छायाचित्रे आणि काही दस्तऐवजांमधून दोघांनी गुप्तपणे विवाह केल्याचे संकेत मिळाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलीस संबंधित कागदपत्रे, विवाहस्थळ, साक्षीदार आणि अन्य पुरावे गोळा करत आहेत.