भारताने जगाला दाखवली थेट ताकद, अखेर करूनच दाखवले, मोठ्या मुस्लिम देशाने..
Tv9 Marathi July 08, 2026 11:45 AM

भारताने पुन्हा एकदा आपली ताकद जगाला दाखवली. भारताचे ब्रम्ह्योस मिसाईल खरेदी करण्यासाठी काही देशांची लाईन लागली आहे. भारताची सैन्य ताकद अत्यंत मजबूत आहे. पाकिस्तानविरोधातील ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगाला भारताने आपली ताकद दाखवली. भारताने पाकिस्तानला काही तासातच सळो की पळो करून सोडले. हेच नाही तर भारताकडून होणारे घातक हल्ले पाहून पाकिस्तानने थेट भारताचे हल्ले थांबवण्याकरिता अमेरिकेचे पाय पकडले. भारतावर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला. पाकिस्तानला हे कळून चुकले आहे की, आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतापुढे उभेच राहू शकत नाही. भारताचे ब्रम्ह्योस मिसाईल खरेदी करण्यासाठी अनेक देशांनी आता गर्दी केली. 2022 पर्यंत भारताचे मिसाईल विदेशी सैन्य खरेदी करत नव्हते. मात्र, आता ब्रम्ह्योसची ताकद पाहून अनेकांनी हे मिसाईल खरेदी करण्यासाठी गर्दी केली.

वियतनाम आणि फिलीपींस यांच्यानंतर आता मोठा मुस्लिम देश इंडोनेशिया ब्रम्ह्योस मिसाईल खरेदी करणारा तिसऱ्या नंबरचा मोठा देश ठरला आहे. यूएई देखील ब्रम्ह्योस मिसाईल खरेदी करण्याबाबत भारतासोबत चर्चा करत आहे. ब्रम्ह्योस एअरोस्पेस आणि इंडोनेशिया यांच्या रक्षा मंत्रालयात मोठा करार झाला. रक्षा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या करारा जवळपास 200 मिलियन डॉलरचा मानला जात आहे.

या माध्यमातून ब्रम्ह्योसची खरेदी केली जाईल. ब्रम्ह्योस बॅटरी 4 मोबाईल ऑटोनॉमस लॉन्चर, 12 रेडी टू फायर मिसाईल, कमांड पोस्ट, रडार आणि व्हिकलचाही समावेश होतो. यापूर्वी 2022 मध्ये फिलीपींसने एंटी शिप मिसाईल बॅटरीसोबत 375 मिलियन डॉलरचा करार केला होता. ज्याची डिलीवरही करण्यात आली. वियतनामसोबतही 629 मिलियन डॉलरचा करार झाला.

भारत चीनच्या शत्रू देशांना ब्रम्ह्योस मिसाईल देत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये या मिसाईलची ताकद जगाने बघितली. हेच नाही तर भारताचा जिगरी मित्र रशियाला देखील भारताचे हे मिसाईल हवे आहे. रशियाला थेट भारताचे ब्रम्ह्योस मिसाईल युद्धनाैकेवर हवे आहे. इराण आणि अमेरिका युद्धात भारताच्या शेजारी देशाची वाट लागली होती. लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यावेळीही भारताची अर्थव्यवस्था स्थिर होती आणि कच्चे तेल भारतात दाखल होत होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.