Washim News : रस्ता धरण किंवा अन्य कारणासाठी सरकारने जमीन अधिग्रहण केलेल्या जमीनीचा योग्य दर न मिळाल्याने अनेक वेळा जिल्हाधिकारी किंवा संबंधित खात्याचे कार्यालय किंवा मालमत्ता जप्तीच्या कारवाई केल्याचं आपण पाहिलं असेल. मात्र, जमिनीचा मोबदला कमी दिल्याने वाशिम न्यायालयाने (Washim Court) चक्क टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. रस्ता निर्मिती दरम्यान जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांला न दिल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयाचे दार ठोटावले आहे. वाशिम जिल्हा न्यायालयानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मोठा दणका देत वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव टोल प्लाझा (Toll Plaza) जप्त करण्याचे आदेश दिलेत.
Washim Court Historic Order : नेमकं प्रकरण काय?
वाशिम येथील शेतकरी बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांच्या अकृषक असलेल्या जमिनीतून राष्ट्रीय महामार्ग गेला. मात्र, मोबदला देताना त्यांना या जमिनीतील रस्ते आणि खुल्या जागेचा मोबदला देण्यात आला नव्हता. केवळ प्लॉटचा मोबदला दिला. तो ही देताना कमी आणि चुकीच्या दराने कमी देण्यात आला होता. या विरोधात नुकसानग्रस्त शेतकऱ्याने त्यांनी वाशिम जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली तेव्हा जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाला योग्य मोबदला देण्याचे आदेश दिले. मात्र तरीही मोबदला न दिल्याने अखेर गर्जे कुटुंबांनी न्यायालयात धाव घेतली आणि लढा दिला. अखेर न्यायालयाने गर्जे यांच्या बाजूने निकाल देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या आदेश पाळला न गेल्यानं अखेर जिल्हा न्यायाधीश यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची संपत्ती असलेला तोंडगाव येथील टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिलेत. दरम्यान, 20 जुलैपर्यंत महामार्ग प्राधिकरणाने पैसे न भरल्यास प्रत्यक्ष जप्तीची कारवाई होणार असल्याचं गर्जे यांचे वकील उदय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.
घरातील वीज उपकरण दुरुस्त करत असताना अचानक त्यातून प्रवाहित झालेल्या विजेच्या धक्क्यानं तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील टांगा गावात घडली. स्वप्निल शेंडे असं ३५ वर्षीय मृत तरुणाच नाव आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी वीज पुरवठा बंद करून त्याला उपचाराकरिता रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या