तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेविरोधातील धडक मोहीम सुरू केली आहे.
एफडीएने एकाच दिवशी १६ नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांवर छापे टाकले.
नरिमन पॉईंटमधील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीम दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला.
संजय गडदे, साम प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाचं आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. अन्न भेसळ आणि अस्वच्छतेविरुद्ध त्यांनी मोठी मोहीम उघडली असून एफडीएच्या पथकाने एकाच दिवशी तब्बल १६ नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांवर अचानक छापेमारी केली.
Ayodhya Ram Temple: राम मंदिरातून दररोज ६ ते ८ लाखांची चोरी; पैसा नेमका कुठे जात होता?या छापेमारीच्या कारवाईत मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरातील अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक 'रुस्तम आईस्क्रीम'दुकानाला मोठा दणका दिलाय. दुकानाचा परवानात निलंबित करण्यात आलाय. या धडक कारवाईमुळे राज्यातील हॉटेलव्यावसायिक आणि अन्न उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. एकाच दिवसात झालेल्या या मोठ्या कारवाईत अनेक हॉटेल्समध्ये अस्वच्छ कारभार उघड झालाय.
मोठी बातमी! चार महिन्यातच तुकाराम मुंढेंना पालक सचिवपदावरून हटवलं रुस्तम आईस्क्रीम' दुकानात उंदीर आणि माशा वावरमुंबईतील नरिमन पॉईंट येथील 'रुस्तम अँड कंपनी' हे मुंबईतील ग्राहकांचे आणि पर्यटकांचे अत्यंत आवडते आईस्क्रीम केंद्र मानले जाते. मात्र एफडीएच्या पथकाने जेव्हा या ठिकाणी तपासणी केली, तेव्हा तिथली दुरवस्था पाहून अधिकारीही चक्रावले. दुकानात स्वच्छतेचा अभाव होता. दुकानात जिवंत उंदीर आणि घरगुती माशांचा मोठ्या प्रमाणावर वावर आढळून आला.
आईस्क्रीम सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली 'कोल्ड चेन ऑपरेशन्स' खंडित अवस्थेत होती. दुकानात मुदत संपलेले अन्नपदार्थ साठवून ठेवण्यात आले होते. नियमानुसार आवश्यक असलेले अनिवार्य रेकॉर्ड दुकानात ठेवण्यात आले नव्हते, अशा बाबी निर्दशनात आल्यानंतर दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
याशिवाय नागपूरमधील 'श्री हिरा स्वीट्स' येथे मृत उंदराच्या शेजारीच अन्नपदार्थांचे उत्पादन सुरू असल्याचे आढळल्याने त्या आस्थापनावरही परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली. धुळे येथील 'हॉटेल पाटीलवाडा' हे विनापरवाना सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने त्याचाही परवाना निलंबित करण्यात आला.
दरम्यान, राज्यभर सहा धाडी टाकून 9 लाख 60 हजार 416 किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि इतर अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. एका प्रकरणात प्रथम खबरी अहवाल (FIR) दाखल करून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.