'वेलकम टू द जंगल'ची बॉक्स ऑफिसवर हवा, 2 कोटी कमावताच बजेट वसूल; कॉमेडी सिनेमाने किती कमावले?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क July 09, 2026 02:43 PM

Welcome to the Collection: मल्टीस्टारर 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाची सध्या क्रेझ वाढत चालली आहे. या अॅडव्हन्चर - कॉमेडी सिनेमाने प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन केलं. 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाने  नुकतंच रिलीज झालेल्या 'अल्फा' सिनेमालाही टक्कर दिली. या चित्रपटाने अवघ्या काही दिवसात बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली. पहिल्या आठवड्यात या सिनेमाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. पण दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, प्रदर्शनाच्या 13 व्या दिवशी 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाने किती कोटी कमावले? जाणून घेऊयात.

'भूत बंगला' या हॉरर - कॉमेडी सिनेमाला मिळालेल्या यशानंतर अक्षय कुमारचा 'वेलकम टू द जंगल' या सिनेमालाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  खिलाडी अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'ने कमाईच्या बाबतील 100 कोटींचा आकडा पार केला आहे. पहिल्या आठवड्यात मिळालेल्या यशानंतर दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाच्या कमाईत चढ उतार होत असल्याचं दिसून येत आहे.

13 दिवसांत 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाने किती कोटी कमावले? (Welcome to the jungle box office collection day 13)

सिनेमाच्या कलेक्शनबाबतील बोलायचं झाल्यास, 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 93.15 कोटींचे कलेक्शन केले आहे. यानंतर 8 व्या दिवशी या सिनेमाने 4.50 कोटी कमावले. तर, 9 व्या दिवशी 7.50 कोटी, 10 व्या दिवशी 9.75 कोटी आणि 11व्या दिवशी 2.65 कोटींचे कलेक्शन केले.  दरम्यान, 12 व्या दिवशी या सिनेमाने 3 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 13व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या बुधवारी या सिनेमाने 2.35 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. म्हणजेच 13 दिवसांत या सिनेमाने  122.90 कोटी कमावले आहेत.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा सिनेमा 125 कोटींमध्ये तयार करण्यात आला आहे.   दरम्यान, रिलीजच्या 13 दिवसांत या 'वेलकम टू द जंगल' सिनेमाने 122.90 कोटी कमावले आहेत.  दरम्यान, लवकरच हा सिनेमा 150 कोटींचा आकडा पार करेल, यात शंका नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.