Raj Thackeray: थेट मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करत टीका; राज ठाकरे कडाडले
GH News July 09, 2026 04:12 PM

आज मनसे रेल्वे कामगार सेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथील सावरकर सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री करत त्यांना चांगलेच सुनावले आहे.

फडणवीस यांचं विधानसभेतील भाषण…

राज ठाकरे म्हणाले, रेल्वे स्टेशन असतील रेल्वे भरती असतील त्यावर लक्ष ठेवा, स्टॉल कुणाला दिले जातात त्यावर लक्ष ठेवा. बेसावध राहू नका. पायाखालची जमीन गेली तर अडचण होईल. आपल्या सरकारलाच हिंदीची आस्था. फडणवीस यांचं विधानसभेतील भाषण. मिसिंग लिंकवर खांब कोसळला. पाणी येतंय. म्हणे त्याचं राजकारण करू नका. अरे वा. त्याच्यावर बोललं तर राजकारण. इतके दिवस तुम्ही काय करत होता. दुसऱ्यांचं सरकार असताना तुम्ही काय करत होता. त्यावेळी आंदोलन झाली ते राजकारण नव्हतं. स्वत च्या अंगाशी आल्यावर ते राजकारण. असं कसं होईल. काय म्हणतात म्हणे, एकवेळ मला बोला. पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोकं त्या मिसिंग लिंकवर बोलतात. महाराष्ट्राचा कुठे अपमान करायचं. पण सर्व घेऊन जायचं. केंद्र सरकारची सवय लागली. केंद्राच्या कोणत्या गोष्टीबद्दल बोललं तर तुम्ही देशद्रोही.

पुढे ते म्हणाले, आता केंद्राची कामे आहे. त्याचा देशाचा काय संबंध. मिसिंग लिंकबद्दल बोललं तर महाराष्ट्राचा अपमान कुठे आला. लोकांनी प्रश्न विचारायचे नाही ना. इतके दिवस मोबाईलवरून विरोधकांना शिव्या घालायचे ते अंगलट आलंय. दामदुपटीने यांच्या अंगलट आलं. आता त्रास होतोय. तुम्हीच सुरू केल्या या गोष्टी. १०-१२ वर्षात तुम्हीच सुरू केलं. वाईट साईट बोलणं, घाण बोलणं तुमच्या टीमने केलं. तुमच्या अंगावर आल्यावर कसा आला महाराष्ट्राचा अपमान. राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललं तर म्हणे धर्माचा अपमान. यात धर्म कुठे आला. त्या मंदिराबद्दल आमचीही आस्था आहे. १४०० कोटी चोरले जातात, पडदा किती असावा यांच्यासमोर. म्हणे वक्फ बोर्डात चोऱ्या झाल्या तुम्ही नाही बोलला. आम्हाला काय देणंघेणं. राम मंदिरात दानपेटीत टाकलं. त्याची चोरी होत असेल तर त्याच्याबद्दल बोलायचं नाही? काल होसबळे म्हणाले, धर्मविरोधी लोक पसरवत आहे. आम्ही धर्मविरोधी? हा देश धर्मविरोधी आहे? मंदिरातून चोरी होते हे सांगणारं कोण होतं. बोलणारं कोण होतं. भाजपचा खासदारच बोलला चोरी झाली. आम्ही बोललो? देश बोलला? १५ ट्रस्टींपैकी १२ केंद्र सरकार नेमते. १२ पैकी केंद्राने नेमलेली माणसं संघ, भाजप आणि विहिंपशी संबंधित आहे. बाकी कोणी नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.