Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
admin July 10, 2026 07:24 AM
[ad_1]

मुंबई – राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यात अलीकडेच भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर आता आणखी एका भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. या भेटीटे फोटोदेखील समोर आले आहेत.

भाजप नेते विनोद तावडे यांनी ज्येष्ठ राष्ट्रावदी (शरद पवार) नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीनंतर विविध राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात झाली असून दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, 2 सप्टेंबर रोजी एकनाथ खडसे यांचा 75 वा वाढदिवस साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये काही बदल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.