पंचांग -
शुक्रवार : निज ज्येष्ठ कृष्ण १०/११, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.०५ सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय उ. रात्री २.२५, चंद्रास्त दुपारी ३.०७, योगिनी (स्मार्त) एकादशी, भारतीय सौर आषाढ १९ शके १९४८.
दिनविशेष -
१९९८ - राष्ट्रभक्तिपर गीते लिहिणारे गीतकार कवी प्रदीप यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविले.
२०१५ - तब्बल १ हजार ४४० किलो वजन असलेले ब्रिटनचे पाच व्यापारी उपग्रह ‘इस्रो’ने श्रीहरिकोटा येथून यशस्वीपणे आकाशात सोडले.
२०१६ - ब्रिटनच्या अँडी मरेने कॅनडाच्या मिलॉस राओनिच याचे कडवे आव्हान तीन सेटमध्येच परतवून विंबल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकाविले.