Sangli Krishna Flood: कृष्णाकाठच्या नागरिकांना दिलासा; कोयना धरण ५० टीएमसीपर्यंत भरले; सांगलीत 'कृष्णा' पोहोचली ३० फुटांवर
esakal July 10, 2026 10:45 AM

सांगली: धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या सात दिवसांत झालेल्या सलग पावसामुळे कोयना धरण आता ५० टीएमसी इतके भरले आहे. हा टप्पा गाठल्यामुळे जल अभ्यासकांसह कृष्णाकाठच्या लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचवेळी कृष्णा नदीची सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी सायंकाळी ५ वाजता ३० फुटांवर पोहोचली होती. ती ३२ ते ३४ फुटांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

जिल्ह्यात आज दिवसभरात पावसाचा जोर कमी राहिला. वाळवा, शिराळा, मिरज तालुक्यांत हलक्या स्वरुपाचा पाऊस झाली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत पावसाने तळ ठोकला होता. सकाळपासून मात्र अगदी तुरळक पाऊस झाला. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे मात्र नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ नोंदवली गेली. जोवर कोयना धरणातून विसर्ग सुरू होत नाही तोवर कृष्णा नदीतील वाढ ही पाणलोट क्षेत्रातील पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे पाणी पात्रात असेपर्यंत ते वेगाने वाढणार, हे स्पष्ट आहे. पाटबंधारे विभागाकडून त्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे.

कोयनेतून विसर्गाची घाई होणार नाही..?

सध्या पाऊस चांगला पडला असला आणि धरणात पाणीसाठा वाढत असला तरी या स्थितीत कोयनेतून पाण्याचा विसर्ग करण्याची घाई केली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. पावसाचा अंदाज घेऊनच पुढची पावले उचलली जातील, असे सांगण्यात आले आहे.

‘धरणातील परिस्थितीवर लक्ष’

कोयना धरणातील पाणीसाठा, पाऊस, नदीची पाणीपातळी या सर्वांवर जिल्हा प्रशासनाने पूर्ण लक्ष आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली. कृष्णा नदीच्या पाणीपातळीबाबत महापालिका आयुक्त आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्यासोबत चर्चा झाली.

Nagpur Pune Vande Bharat: प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणार नवीन १६/२० डब्यांचा रेक; विदर्भ–पश्चिम महाराष्ट्र प्रवास होणार सोयीचा वारणा धरणात झपाट्याने वाढ

वारणा धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, सायंकाळी पाच वाजता पाणीपातळी १९ फुटांवर पोहोचली होती. या धरणाची साठवण क्षमता ३४ फूट आहे. वारणा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. धरणातून अद्याप विसर्ग करण्यात आलेला नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.