Sanjay Raut : नितीन गडकरींची बदनामी कोण करतंय? संजय राऊत यांचा धक्कादायक खुलासा; मोठी खळबळ
Tv9 Marathi July 10, 2026 02:45 PM

केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन धोरणावरून देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर विविध आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांना उत्तर देताना गडकरी यांनी केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाची ठामपणे पाठराखण केली. “इथेनॉल धोरणामुळे मला कोणताही वैयक्तिक फायदा होत नाही. माझी जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असं गडकरी यांनी म्हटलं होतं. याच मुद्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत स्पष्ट बोलले आहेत. नितीन गडकरींना त्यांच्याच पक्षातील लोक बजनाम करत आहेत, असा धक्काायक दावा संजय राऊत यांनी केला. त्यांच्या आरोपांमुळे मोठी खळबळ माजली आहे.

या मुद्यावर नितीन गडकरी यांनी एक प्रेझेंटेशन दिलं पाहिजे. लोकांच्या मनात जो भ्रम आहे, त्यामध्ये त्यांच्याच पक्षाचे लोक आहेत. नितीन गडकरी यांना बदनाम करण्यात इतर कोणाचा हात नाही, भारतीय जनता पक्षाचेच लोक आहेत, जे गडकरींना बदनाम करून इच्छितात, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. त्यांना एका जाळ्यात अडकवायचं आहे. 2014 पूर्वी त्यांची पक्षाध्यक्षपदाची जी सेकंड टर्म होती, तेव्हाही त्यांना असंच फसवण्यात आलं. 2029 साली गडकरी हे पंतप्रधानपदासाठीचे मजबूत दावेदार आहेत, त्यामुळेच त्यांना बदनाम करा, एवढं बदनाम करा की लोकांच्या मनात त्यांची छबी, प्रतिमा अतिशय खबार व्हावी असा डाव आहे. आणि हे त्यांच्याच पक्षाचे लोक करत आहेत, हे त्यांनाही माहीत आहे, असा दावा राऊत यांनी केला.

एकनाथ शिंदेंना चोख प्रत्युत्तर

दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर काल ठाकरे गटाने नाराजी वर्तवली होती. संजय राऊत हेही यावरून बोलले होते. मात्र शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला मी भेटलो, यामुळे कोणाच्या पोटत दुखत असेल तर ते चुकीचं . एवढा कद्रूपणा बरा नव्हे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिंदेंना चोख प्रत्युत्तर दिलं.  हो, कद्रूपणा आहे म्हणो. एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडला आणि ते भाजपसोबत गेले म्हणून आमचं भांडण नाहीच आहे. पण अमित शहांच्या मदतीने त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर त्यांनी दरोडा टाकला, हे भांडण आहे. अजित पवार हे पवारांचा पक्ष सोडून गेले म्हणून भांडण्याचं कारण नाही. शरद पवारांच्या हयातीत, त्यांनी स्थापन केलेला पक्ष अमित शहांच्या मदतीने तुम्ही चोरताय, लूट केलीत हा वादाच विषय आहे.

माझ्यासाराख माणूुस हे विसरत नाही, आमचं अख्ख आयुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे मालक तुम्ही कसे झालात ? तुम्ही कसे आई-बाप झालात त्या पक्षाचे ? किंवा   पार्थ पवार, जय पवार, सुनेत्राताई पवार , सुनिल टतकरे, प्रफुल पटेल, हे शद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षाचे आई-बाप होऊ शकतात का ? असा सवाल राऊत यांनी विचारला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.