राज्यात ‘ऑपरेशन टायगर-3’च्या चर्चा; भास्कर जाधवांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले, ‘याचा अर्थ
Marathi July 10, 2026 04:25 PM

ऑपरेशन टायगरवर भास्कर जाधव: ऑपरेशन टायगर संदर्भात दररोज चर्चा आणि बातम्या पेरल्या जाताय. वारंवार त्यावर बोललं जात आहे. यावरून हे सिद्ध झालं आहे ते खरे टायगर आमच्या शिवसेनेत (Shivsena UBT) आहे, आणि त्यांच्या गटात (Shivsena) कुत्रे आहेत. असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ आमदार भास्कर जाधव (भास्कर जाधव) यांनी ऑपरेशन टायगरवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. (ऑपरेशन टायगरवर भास्कर जाधव)

Bhaskar Jadhav : वारकऱ्यांना पैसे देतोय सांगितलं आणि सर्वांना फसवून ही सत्ता हस्तगत केली

वारीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा भावनिक होता. मात्र या सरकारने वारीकरता पैसे देतोय असं सांगितलं आणि सर्वांना फसवून ही सत्ता हस्तगत केली. कोणाच्याही भावनेचा आणि मागणीचा विचार हे सरकार करत नाहीत. वारकऱ्यांच्या प्रति सेवा भाव असला पाहीजे. पण यांच्या मनात फक्त सत्ता भाव आहे, म्हणून हे घडत आहे. असेही आमदार भास्कर जाधव (भास्कर जाधव)म्हणाले.

Bhaskar Jadhav on Devendra Fadnavis: सत्तेचा दर्प आहे म्हणून फडणवीस बोलत आहेत, कोणाला सोडणार नाही

आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) हे उथळ आहेत. त्यावेळी ते टीका करत होते, जसं सगळी अक्कल देवाने मलाचा दिलीय असं त्यांना वाटतं. हेच भातखळकर राज ठाकरेंकडे गेले होते, कोणाला निष्ठा सांगताहे? कधीतरी या लोकांना जागा दाखवावी लागते, ते मी दाखवून दिली. भाजपची पंरपरा जर पाहिली तर आम्ही काहीही बोलू, आमच्यावर कोणी बोलायचं नाही. सत्तेचा दर्प आहे म्हणून फडणवीस बोलत आहेत, कोणाला सोडणार नाही. मुख्यमंत्री यांना आता भान उरले नाही. मुख्यमंत्री पहिला काय बोलत होते आणि आता काय बोलत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कोणी केला, हे सर्वांना माहीत असल्याचे म्हणत आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार दाबा केला आहे.

विधीमंडळ अधिवेशनात विविध मुद्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अरे तुम्ही काय केलं ते राज ठाकरेंनी सांगितलं होतं. राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नाही, असे म्हणत भास्कर जाधवांनी अतुल भातखळांवर थेट हल्लाबोल चढवला. यामुळं सभागृहात काही काळ वातावरण गरम झआल्याचं पाहायला मिळालं. अशातच आज पुन्हा एकदा आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार दाबा करत टीका केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.