साऊथ सिनेसृष्टीतून दु:खद बातमी समोर आली
चित्रपट निर्माते आर. चेझियान यांचे निधन झाले
५७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली
रग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला
सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि छायाचित्रकार आर. चेझियान यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. चेझियान हे दिर्घ आजाराने ग्रस्त होते. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 'टू लेट' या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
आर. चेझियान हे पडद्यावर कधी दिसले नाही पण ते कॅमेऱ्यामागे उत्कृष्ट काम करत होते. दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपल्या कामातून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. छायाचित्रकारआर. चेरियन यांनी 'जोकर', 'कॉलेज', 'थेनमेरकू परुवाकाट्रू' आणि 'परदेसी' यांसारख्या चित्रपटांवर काम केले आहे. त्यांना २०१३ च्या लंडन चित्रपट महोत्सवात 'परदेसी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट छायाचित्रण केल्याबद्दल पुरस्कार मिळाला होता.
Death News : 'लॉक अप २' मधील स्पर्धकावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधनआर. चेझियान यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या 'टू लेट' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाला 'गोल्डन बेंगाल टायगर' ट्रॉफी, ७,००,००० रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्रही मिळाले. 'टू लेट' या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचीही मने जिंकली. या चित्रपटामध्ये एका भाड्याचे घर शोधणाऱ्या एका निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबाचा संघर्ष त्यात हृदयस्पर्शीपणे चित्रित करण्यात आला होता.
Death News : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगरआर चेझियान हे मूळचे शिवगंगा जिल्ह्यातील नट्टरसनकोट्टाई येथील रहिवासी होते. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी इंजिनिअर होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पी. सी. श्रीराम यांच्यासोबत काम करून केली होती. चित्रपट निर्माता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यापूर्वी त्यांनी 'थेनमेरकू परुवाकाट्रू', 'परदेसी' आणि 'जोकर' यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले होते.
Actor Death: मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा मुंबईत पेट्रोल पंपावरच मृत्यू; नेमकं काय घडलं