दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह सध्या आपल्या प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहेत. दीपिकाने आधीच ‘किंग’चं शूट कंप्लीट केलं आहे. आता अल्लू अर्जुनच्या ‘राका’ मध्ये ती काम करणार आहे. दुसरीकडे ‘धुरंधर’ नंतर रणवीर सिंह सुद्धा चर्चेत आहे.’प्रलय’ त्याचा पुढचा चित्रपट आहे. फॅन्सना दोघांच्या पुढच्या चित्रपटाची प्रतिक्षा आहे.
त्यानंतर आला ‘बाजीराव मस्तानी’. 2015 साली आलेल्या या चित्रपटाची गाणी सुपरहिट होती. रणवीर सिंह, दीपिका पादुकोण सोबत पुन्हा एकदा प्रियंका चोपडाने काम केलेलं. चित्रपटाचं बजेट 135 कोटी रुपये होतं. प्रत्येकाने जबरदस्त इम्प्रेस केलेलं. जगभरात या चित्रपटाने 357 कोटी रुपयांची कमाई केलेली.